मराठा सेवा संघातर्फे निलंगा रुग्णालयास ऑक्सिजन बेडचे अद्ययावत साहित्य भेट

निलंगा,११ मे /प्रतिनिधी  :- मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी  वतीने निलंगा उपजिल्हा रुग्णालयास  25 ऑक्सिजन बेड चे अद्ययावत साहित्य भेट देऊन  सामाजिक बांधिलकीची जोपासना केली  आहे.

मराठा सेवा संघ निलंगा शाखेच्या वतीने काही दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयास 25 ऑक्सिजन बेड अद्ययावत करून देण्याचे जाहीर करण्यात आले होते.  त्यासाठी निलंगा मराठा सेवा संघाच्या वतीने कोव्हीड निधी जमा करण्यात आला होता,. त्या निधी मधून 2 लाख 40 हजार 40 रुपये किमतीचे साहित्य मंगळवार दि.11 मे रोजी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात तहसीलदार गणेश जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे, डॉ. प्रल्हाद सोळुंके, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्या उपस्थितीत हे साहित्य उपजिल्हा रुग्णालयास भेट देण्यात आले आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक दिलीप धुमाळ, जिल्हा कार्याध्यक्ष  एम. एम. जाधव , तालुकाध्यक्ष डॉ. हंसराज भोसले, जिल्हा संघटक विनोद सोनवणे, डी. एस. धुमाळ, पत्रकार संजय इंगळे,कुमोद लोभे,अरुण पाटील, अंकुश ढेरे आदी उपस्थित होते.

 मराठा सेवा संघ गेल्या अनेक वर्षांपासून निलंगा शहरात विविध उपक्रम राबवून वैचारिक मेजवानी देण्याचे कार्य करत आहे.कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण ही या समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून एक  बैठक घेण्यात आली व या बैठकीत कोविड पेशंटला कशा प्रकारे मदत करता येईल यावर सविस्तर चर्चा केली गेली.चर्चे अंती असे ठरले की,आपण काय द्यायचे यापेक्षा तिथे सध्या कशाची गरज आहे हे तेथील डॉक्टरांना विचारून आपण ती मदत देण्याचे ठरले .   

उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अधिकाऱ्याकडून सध्या ऑक्सिजन बेडची कमतरता असून त्यासाठी लागणारी साधन सामग्री मिळाल्यास गरजू रुग्णांची सोय होऊ शकते अशी माहिती मिळाली. यावर विचार विमर्श करून अवघ्या दोनच दिवसात 25 बेड साठी लागणारा निधी मराठा सेवा संघ या ग्रुप वर आवाहन केल्यानंतर  दोन लाख  पन्नास हजारांचा  निधी जमा झाला व आज त्यासाठी लागणारे साहित्य मान्यवरांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आले.  ज्या दात्यांनी आपला निधी दिला आहे तो  सत्कार्यासाठी वापरण्यात आले असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.