सावधान औरंगाबादकरांनो,आज 132 रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 969 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि.11 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 132 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2407 झाली आहे. यापैकी 1317 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 121 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 969 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

No photo description available.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जयसिंगपुरा, बेगमपुरा (1), मिसरवाडी (1), सुभेदारी विश्रामगृहा जवळ (1), उस्मानपुरा (2), एन आठ (1), जुना बाजार (1), आकाशवाणी परिसर (1), उल्कानगरी (1), संजय नगर (1), एन दोन सिडको (1), गणेश कॉलनी (1), बुड्डीलेन (1), बायजीपुरा (1), बंजारा कॉलनी (1), हेडगेवार रुग्णालय परिसर (1), एमजीएम रुग्णालय परिसर (1), शिवाजी नगर (5), उत्तम नगर (3), कैलास नगर (7), गादिया विहार (1), सहकार नगर (1), नक्षत्रवाडी (1), चेलीपुरा (1), टी.व्ही सेंटर, पोलिस कॉलनी (1), संजय नगर, बायजीपुरा (1), एन सात सिडको (1), न्यायनगर (2), हुसेन कॉलनी (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), सातारा परिसर (1), साईनगर, एन सहा (2), एन आठ सिडको, गजराज नगर (1), पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा (2), हरिप्रसाद अपार्टमेंट (1), दशमेश नगर (1), पद्मपुरा (2), गांधी नगर (3),सिल्कमिल कॉलनी (1),विशाल नगर (3), बेगमपुरा (2), गोविंद नगर (1), समता नगर (1), फाजीलपुरा (4), न्यू हनुमान नगर (5), सिडको एन आठ (12), गौतम नगर, घाटी परिसर (2), रशीदपुरा (1), मयूर पार्क म्हसोबा नगर (1), भवानी नगर (2), भारतमाता नगर (3), विजय नगर (1), गारखेडा, गजानन नगर (1), कोहिनूर कॉलनी (1),‍ जिल्हा परिषद परिसर (1), हर्सुल सावंगी (1), सिव्हील हॉस्पीटल परिसर (3), टी व्ही सेंटर (1),बिस्मिला कॉलनी (3), सिडको वाळूज महानगर एक (2), एकता नगर, हर्सुल परिसर (1), बजाज नगर (7), साई नगर, पंढरपूर (3), जुनी मुकुंदवाडी (7), नारेगाव (1), गंगापूर (1), नायगाव (1), सिल्लोड (1), उपसंचालक आरोग्य कार्यालय परिसर (1), अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 57 महिला आणि 75 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *