भारतात 24 तासांत 3.8 लाखांपेक्षा अधिक रूग्ण कोविडमुक्त

भारतातील लसीकरणाची व्याप्ती जवळपास 17 कोटी
18-44 वयोगटातील 17.8 लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली ,९ मे /प्रतिनिधी 

जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोविड-19 रुग्ण संख्येत झालेल्या अभूतपूर्व वाढीची आव्हाने आणि आवश्यकता पूर्ण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जागतिक समुदाय मदतीचा हात पुढे करत आहे. या गंभीर टप्प्यात केंद्र सरकार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या प्रयत्नांना पूरक म्हणून या जागतिक मदतीचे प्रभावीपणे आणि तातडीने वाटप होईल, हे सुनिश्चित करत आहे.

या अंतर्गत 6,608 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 3,856 ऑक्सिजन सिलिंडर्स, 14 ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट्स, 4,330 व्हेंटिलेटर / बी आय पीएपी (Bi PAP)/ सी पीएपी (C PAP) आणि 3 लाखांपेक्षा  जास्त रेमडेसिवीर कुप्या आतापर्यंत वितरीत करण्यात आल्या आहेत/पाठवल्या आहेत.

देशभरात लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात लसीकरण अधिक  विस्ताराने  होत असून, आज देशभरात राबविल्या जाणाऱ्या कोविड-19 लसींच्या एकूण मात्रांनी 16.94 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे.देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.78% मात्रा दहा राज्यांमध्ये देण्यात आल्या आहेत.

18-44 वर्षे वयोगटातील 2,94,912 लाभार्थ्यांना गेल्या 24 तासांत कोविड लसीची पहिली मात्रा मिळाली, आणि 30 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधे एकत्रितपणे 17,84,869 जणांना लसीची मात्रा प्राप्त झाली. 

गेल्या 24 तासांत 20 लाखाहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.लसीकरण मोहिमेच्या 111  व्या दिवसापर्यंत ( 8 मे 2021 पर्यंत)  20,23,532 लसींच्या मात्रा  देण्यात आल्या. 16,722 सत्रांमधून 8,37,695 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 11,85,837 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा मिळाली.

आज भारतात  एकूण 1,83,17,404 रूग्ण कोविडमुक्त झाले. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 82.15% आहे.गेल्या 24 तासांत 3,86,444 रुग्ण बरे झाले.बरे झालेल्या रुग्णांपैकी 75.75% रूग्ण दहा राज्यांतील आहेत.गेल्या 24 तासांत 4,03,738 नवीन रुग्णांची नोंद झाली.गेल्या 24 तासांत दहा राज्यांमध्ये 71.75% नवीन रुग्णांची नोंद झाली.महाराष्ट्रात दैनंदिन सर्वाधिक नवीन 56,578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये 47,563 आणि केरळमध्ये 41,971 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

देशभरात आतापर्यंत एकूण 30.22 कोटीहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर खाली दर्शविल्याप्रमाणे पॉझिटिव्हीटीचा दर 21.64% आहे.

भारताची एकूण सक्रीय रूग्ण संख्या 37,36,648 वर पोहोचली आहे.  देशातील एकूण रुग्णांपैकी 16.76% रूग्ण सक्रीय आहेत. देशात गेल्या 24 तासांत एकूण 13,202 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.भारताच्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी  82.94%  रूग्ण 13 राज्यांत आहेत.

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून सध्या तो 1.09% आहे.गेल्या 24 तासांत 4,092 मृत्यूंची नोंद झाली.दैनंदिन नवीन मृत्यूंपैकी 74.93% मृत्यूची नोंद दहा राज्यांमध्ये झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले (864), कर्नाटकमध्ये दैनंदिन 482 मृत्यूंची नोंद झाली.20 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये मृत्यूचे प्रमाण प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे 176 इतके असून राष्ट्रीय सरासरीपेक्षा ते कमी आहे.16 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये मृत्यूचे प्रमाण प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.दीव आणि दमण, दादरा आणि नगरहवेली, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि लक्षद्वीप या चार राज्ये / केंद्रशासित प्रदेशांत गेल्या 24 तासांत कोविड -19 मृत्यूची नोंद नाही.