राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना 17.56 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रा मोफत उपलब्ध

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 72 लाखांहून अधिक मात्रा उपलब्ध
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002C3JA.jpg


नवी दिल्ली ,९ मे /प्रतिनिधी 

लसीकरण, हा  संपूर्ण देशभरातील कोविड  नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या (चाचणी, संपर्कातील व्यक्तिंचा मागोवा, उपचार आणि कोविड अनुरुप वर्तणूक यांचा समावेश‌ असलेल्या) पाच घटकांच्या रणनीतीचा अविभाज्य भाग आहे.


कोविड-19  लसीकरणाच्या उदारमतवादी आणि गतीशील अशा तिसऱ्या टप्प्यातील रणनीतीची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरू झाली आहे. नवीन पात्र लोकसंख्या गटांची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे. पात्र वयोगटातील लाभार्थी एकतर थेट कोविन पोर्टलवर (cowin.gov.in) किंवा आरोग्यसेतू अ‍ॅपद्वारे नोंदणी करू शकतात.


भारत सरकारने आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य 17.56 कोटी लसींच्या मात्रा (17,56,20,810) प्रदान केल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या लसींसह  एकूण  16,83,78,796 लसींच्या  मात्रा देण्यात आल्या आहेत (आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार)

72 लाखांहून अधिक कोव्हिड लसींच्या मात्रा (72,42,014) अद्यापही राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत. नकारात्मक शिल्लक दर्शविणाऱ्या राज्यांतील मात्रा सशस्त्र दलांने पुरविलेल्या लसीच्या मात्रांशी जुळत नसल्यामुळे पुरविल्या गेलेल्या लसींपेक्षा जास्त वापर (वाया गेलेल्या मात्रांसहित समाविष्ट) दर्शवित आहेत.

पुढील तीन दिवसांत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना आणखी  46 लाखाहून अधिक (46,61,960) लसींच्या मात्रा प्राप्त होतील.