परभणीत 1 हजार 37 कोरोनामुक्त; 462 नवे बाधित तर 12 जणांचा मृत्यू

परभणी , ९ मे /प्रतिनिधी :- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मार्च महिन्यानंतर दिवसेंदिवस वाढत होता. त्यात एप्रिल महिन्यात प्रचंड वाढ झाली. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात आढळलेले रुग्ण एकट्या एप्रिल महिन्यात आढळले. त्यानुसार बाधितांचा आकडा 43 हजारांच्यावर पोहोचला. मात्र, आता मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून काहीसा दिलासा मिळत आहे. 1 मेपासून दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या 9 दिवसात नव्याने 6607 नवे बाधित आढळले, तर 8083 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

Displaying VideoCapture_20210313-143044.jpg


      दरम्यान, शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्याच प्रमाणात घटतांनाही दिसून येत आहेत. आज रविवारी 462 नवीन बाधित आढळले तर 1037 कोरोनामुक्त झाले. तसेच 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 6 हजार 570 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 27 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 42 हजार 970 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 35 हजार 373 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 63 हजार 239 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 20 हजार 167 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 42 हजार 970 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1053 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.      दुर्दैवी म्हणजे गेल्या 24 तासात जिल्ह्यात 12 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 11 पुरुष तर केवळ एका महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयात 6 तर जिल्हा रुग्णालयाच्याच आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भारत 2 व स्वाती या खाजगी हॉस्पिटलमध्ये 1 अशा एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खाजगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 31 कोरोना हॉस्पिटल सुरू असून, या रुग्णालयांमध्ये 1910 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या 600 बेड रिकामे आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात 2 तर जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटलमध्ये 63 बेड, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 51, परभणी आयसीयू 2, स्वाती 8, भारत हॉस्पिटल 36, डॉ.प्रफुल पाटील हॉस्पिटल 37, देशमुख 8, अक्षदा मंगल कार्यालय 61, सूर्या 10, प्राईम 14, मोरे 4, अनन्या 3, सामले 8, सिद्धिविनायक 3,  ह्यात 6, सुरवसे मॅटर्निटी 3, पाडेला 3, पार्वती 10, रेणुका 177, देहरक्षा 16, स्पर्श हॉस्पिटल 14, गोकुळ 7, पोले 38, पांडुरंग 3 तर कान्हेकर या खाजगी हॉस्पिरटलमध्ये 10 बेड शिल्लक आहेत. तर 5 हजार 260 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत. दरम्यान, नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.