नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 19 आस्थापना वर कारवाई 

औरंगाबाद,८ मे /प्रतिनिधी :

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार उपायुक्त कार्यालय औरंगाबाद व महानगरपालिका औरंगाबाद यांच्या समन्वयाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 19 आस्थापना यांच्या विरुद्ध आज क्रांती चौक व सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यवाही पथकात कामगार उपायुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी रोहन रुमाले, अमोल जाधव,सुविधकार तथा दुकाने निरीक्षक गोविंद गावंडे विठ्ठल बैद्य व महेंद्र अंकुश हे हजर होते. तसेच महानगरपालिका कार्यालयातील वॉर्ड ऑफिसर प्रकाश आठवले, सलमान काझी वरिष्ठ लिपिक,अलीम शेख कनिष्ठ लिपिक,सय्यद अफझल वसुली अधिकारी व इतर पथक यांच्या द्वारा कार्यवाही करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कार्यवाहीत पुढील आस्थापना सील करण्यात आले आहेत .
1.ऑनेस्टी, 2.करिष्मा शॉप, 3. साबा कलेक्शन, 4.गुलशन क्लाॅथ ,5.भारत वॉच , 6. झरा क्लाॅथ ,7.आर.के कलेक्शन
8.चांडक किराणा, 9.अभय ट्रेडर्स ,10.रतनलाल मोतीलाल , 11.पंजाब शुटींग शर्तींग ,12.फेमस A1 ट्रेडर्स
13.युनूस टी ,14.रुक्मिणी साडी सेंटर ,15.मनोकामना क्लाथ सेन्टर16.सत्त्या इलेक्ट्रॉनिक , 17 गुड लक फ्लॉवर 18 लुकिंग बॉईज कापड दुकान ,19.लक्की प्लांटस अँड फ्लोरिस्ट