देशात चार लाखांपेक्षा जास्त  नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवर सर्वात जास्त म्हणजे 54,022 नव्या कोविड रुग्णांची नोंद

भारताचे एकूण लसीकरण 16.73 कोटी पेक्षा अधिक

18 ते 44 वयोगटातील 14.8 लाखाहून अधिक लाभार्थीचे लसीकरण

नवी दिल्ली ,८ मे /प्रतिनिधी 

गेल्या 24 तासांत, देशात 4,01,078 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.नव्याने नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 70.77% रुग्ण देशातील दहा राज्यांमधील आहेत.महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवर सर्वात जास्त म्हणजे 54,022 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. त्यापाठोपाठ, कर्नाटकात एका दिवसात 48,781 आणि केरळमध्ये 38,460 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 37,23,446 इतकी झाली आहे. आता हे प्रमाण देशातील एकूण कोविड रुग्णसंख्येच्या 17.01% इतके झाले आहे.देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 80.68% रुग्ण बारा राज्यांमध्ये एकवटलेले आहेत.

राष्ट्रीय मृत्युदर सतत कमी होत असून सध्या तो 1.09% इतका आहे.गेल्या 24 तासांत, कोविडमुळे  देशात 4,187 रुग्णांचा मृत्यू झाला.यापैकी 77.29% रुग्ण देशाच्या दहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 898 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, तर त्यापाठोपाठ कर्नाटकात एका दिवसात 592 रुग्ण मृत्युमुखी पडले.देशातील दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली, मिझोरम आणि अंदमान निकोबार द्वीपसमूह या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोविड संसर्गामुळे रुग्ण दगावल्याची एकही नोंद झालेली नाही.

भारतात आतापर्यंत कोविडमधून बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 1,79,30,960 इतकी झाली आहे. राष्ट्रीय रोगमुक्ती दर 81.90% आहे.गेल्या 24 तासांत 3,18,609 रुग्ण कोविडमुक्त झाले अशी नोंद झाली आहे.कोविडमुक्त  झालेल्या एकूण रुग्णांपैकी 71.93% रुग्ण देशाच्या 10 राज्यांमधील आहेत.देशात आतापर्यंत कोविड संसर्ग निश्चिती साठी  एकूण 30 कोटींहून जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर देशातील एकूण कोविड संसर्गाचा दर 7.29% इतका झाला आहे. 

देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी (15,864) रुग्ण आहेत.तर, देशातील 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त  रुग्णांची नोंद झाली आहे.

लसीकरण 16.73 कोटी पेक्षा अधिक

जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोविड-19 ग्रस्तांच्या संख्येत अभूतपर्व अशी तीव्र वाढ होत आहे, या आव्हानाचा सामना करण्यासाठीच्या गरजा पुरविण्यासाठी भारताला पाठींबा देण्याच्या उद्देशाने जागतिक समुदाय मदतीचा हात पुढे करीत आहे. भारताप्रती असलेल्या जगाच्या सद्भावनेचे आणि ऐक्याचे ते प्रतिबिंब आहे. या कठीण काळावर मात करण्यासाठी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी हाती घेतलेल्या प्रयत्नांना मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार जागतिक मदतीचे परिणामकारक आणि जलद वितरण तसेच पुरवठा सुनिश्चीत करीत आहे. 

आतापर्यंत 2933 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, 2429 ऑक्सिजन सिलेंडर्स, 13 ऑक्सिजन निर्मिती  संयंत्रे, 2951 व्हेंटीलेटर्स / Bi PAP/ C PAP  आणि रेमडेसीवीर औषधाच्या 3L हून जास्त कुप्यांचे वितरण करण्यात आले आहे.

दुसरीकडे, राष्ट्रीय पातळीवरील लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याच्या वाढत्या विस्तारामुळेआज देशात मोहिमेच्या  सुरुवातीपासून देण्यात आलेल्या मात्रांची एकूण संख्या 16.73 कोटीच्या पलीकडे पोहोचली आहे.

देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वय वर्षे 18 ते 44 वयोगटातील एकूण 14,88,528 लाभार्थ्यांनी कोविड लसीची पहिली मात्रा घेतली आहे. यामध्ये अंदमान निकोबार बेटे (663), आंध्रप्रदेश (148), आसाम (33,693), बिहार (291), चंदीगड (2), छत्तीसगड (1,026), दिल्ली (2,41,870), गोवा (934), गुजरात(2,47,652), हरियाणा (2,04,101), हिमाचल प्रदेश (14), जम्मू-काश्मीर  (26,161), झारखंड (81), कर्नाटक (8,681), केरळ (112), लडाख (86), मध्यप्रदेश (9,833), महाराष्ट्र (3,08,171), मेघालय (2), नागालँड (2), ओदिशा (35,152), पुदुचेरी (1), पंजाब (2,785), राजस्थान (2,49,315), तामिळनाडू (10,703), तेलंगणा (498), त्रिपुरा (2), उत्तर प्रदेश (1,02,407), उत्तराखंड (19) आणि पश्चिम बंगाल (4,123) यांचा समावेश आहे.

लसीकरण मोहिमेतील सुरुवातीपासूनची आकडेवारी लक्षात घेता, आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीच्या अंतरिम अहवालानुसार, देशात एकूण 24,37,299 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून कोविड लसीच्या 16,73,46,544 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 95,22,639 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 64,30,277 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,38,62,998 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 76,46,634 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 18 ते 45 वयोगटातील 14,88,528  लाभार्थी (पहिली मात्रा), 60 वर्षांहून जास्त वयाचे 5,35,04,312 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,42,87,313 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 5,47,33,969 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 58,69,874 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांपैकी 66.81% मात्रा दहा राज्यांमध्ये दिल्या गेल्या आहेत.गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या सुमारे 23 लाख  मात्रा देण्यात आल्या.लसीकरण मोहिमेच्या 112 व्या दिवशी, (7 मे 2021 रोजी) कोविड प्रतिबंधक लसीच्या  22,97,257 मात्रा देण्यात आल्या. एकूण 18,692 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून  9,87,909  लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 13,09,348 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.