अक्का फाऊंडेशनतर्फे १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द

निलंगा, ८ मे /प्रतिनिधी

लातूरच्या माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.
लातूरचे भूमिपुत्र प्रशांत गिरबने (डायरेक्टर जनरल, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर, पुणे) यांच्या सहकार्याने, अक्का फाऊंडेशन तर्फे १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आले. 


निलंगा येथे ०७, शिरूर अनंतपाळ येथे ०३, देवणी येथे ०३ व कासार शिरसी येथे ०२ असे आवश्यकतेनुसार वाटप करण्यात आले आहे.
या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी निलंगा उपजिल्हाधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, उपजिल्हा रुग्णालय, निलंगाचे वैद्यकीय अधीक्षक  दिलीप सौंदळे, निलंगा नगरीचे नगराध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नेहमीप्रमाणे याही समाजोपयोगी उपक्रमासाठी पुढाकार घेऊन सुनियोजित पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर प्रयत्नशील होते. हा उपक्रम अनेक रुग्णांसाठी सहाय्यभूत होणार आहे.