प्लाझ्मासाठी स्वतःहून   दीपक शिंगडे पुढे आले..आणि रुग्णांचे नातेवाईक गहिवरले…..!

लोहा ,७ मे /प्रतिनिधी  

कोविड रुग्णांसाठी    प्लाझ्मा मिळविण्यासाठी मोठे कष्ट  घ्यावे लागतात…त्यात अपेक्षित यश मिळेल याची शाश्वती नसते ..कधी.. कधी..तो प्लाझ्मा  जुळत नाही… तो देण्यासाठी स्वतःहून पुढे येणारे फारच कमी.. लोह्यात शिक्षण झालेले पण अहमदपूर येथे वास्तव्याला असलेले युवा कार्यकर्ते नगरसेवक दीपक वामनराव शिंगडे  हे   स्वतःहून  प्लाझ्मा दान देण्यासाठी पुढे आले .. लातूरहुन उदगीरला तो प्लाझ्मा रुग्णाला देण्यात असला..रुग्ण नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले..त्यांनी दिपकची कृतज्ञात व्यक्त केली   

कोविड १९मदतीचा हात  ( हेल्पिग ग्रुप ) च्या हेल्पलाईन वर मंगळवारी   एका रुग्ण  नातेवाइकांचा कॉल …  औराद  तालुक्यातील ‘चिखली’ गावच्या कोरोनाबाधित रुग्णाला “AB ” निगेटिव्ह प्लाझ्मा लागणार आहे ….आणि  लगेच आपल्या टीमने क्षणाचाही विलंब न करता याची दखल घेऊन प्लाझ्मा असलेला व्यक्ती कोठे आहे का ? तपासायला सुरुवात केली.आपल्या  हेल्पिग  ग्रुपची दखल घेऊन अहमदपूर नगर पालिकेचे  नगरसेवक दीपक वामनराव शिंगडे ( वय 42)  यांनी स्वतःहून    मला कोविड होऊन 28 दिवस झाले आहेत आणि मी प्लाझ्मा  देण्यास तयार आहे असे सांगितले .

एबी निगेटिव्ह हा रक्त ग्रुप तसा दुर्मिळच. दीड महिन्या पूर्वीच दीपक यांच्या   वडिलांचे  निधन झाले.आई कलावतीबाई शिंगडे या लोह्याच्या शिवछत्रपती प्राथमिक शाळेच्या सेवा निवृत्त मुख्याध्यापिका ,.त्यांनाही कोविड संसर्ग झालेला तसेच पत्नी मीनाक्षी ज्या की अहमदपूर नगर पालिकेच्या माजी सभापती त्यांना कोरोनाची लक्षणे होती  तसेच भाऊ प्रकाश, भावजयी महानंदा यासर्वाना कोविड झाला त्यातून हे कुटूब अद्याप सावरले नाही.  स्त्री रोग तज्ज्ञ डॉ जयश्री साब्दे , व वैदयकीय अधिकारी डॉ राजश्री कलमे या दोन डॉक्टर बहिणींनी उपचार केले. दीपक हा धाडसी ,त्याचा मोठा मित्रपरिवार ,व हळव्या मनाचा सहकार्य वृत्तीचा त्यांनी आपले दुःख बाजूला सरळ आणि प्लाझ्मा  देण्यासाठी पुढे आला     *”एकमेका साह्य करू …या  या विचारांचा प्रेरित झालेला हा ग्रुप   दुपारी एक  वाजता अहमदपूर ते लातूर या   प्रवासाला  .. सर्व प्रोसेस पूर्ण झाली  संध्याकाळी पाच च्या सुमारास प्लाझ्मा डोनेट केला..आणि त्यांनंतर त्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला तो सत्कर्म केल्याचा आनंद ..!! आणि रुग्ण नातेवाईक यांच्या डोळ्यात अश्रू …कृतज्ञात भाव ..कोण कुठले..पण माणुसकीने हे सर्वजण जीव वाचविण्यासाठी  धडपडत आहेत  . 

खरंच त्यांचे कार्य शब्दांत मांडणे  सोपं नाही..दीपक सारख्या  व्यक्तित्वामुळेच अजूनही माणुसकी जिवंत  आहे। !तुम्ही पण कोरोनामुक्त होऊन २८ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असतील तर प्लाझ्मा डोनेट करून एखाद्याचा जीव वाचवू शकता..कोरोनातून बरे झालेल्या सर्वांनी प्लाझ्मा डोनेशन करावे असे आवाहन दीपक शिंगडे व मित्रांनी केले आहे  !