महामारीच्या काळात अन्नदानच्या माध्यमातून जेवणाची सोय

श्री स्वामी समर्थ अन्नसेवा मंडळाचा उपक्रम 

उमरगा ,६ मे /प्रतिनिधी 

कोरोना  रुग्ण,  नातेवाईक व त्यांची  सेवा करण्यासाठी भाग्यच लाभते,अशा महामारीच्या काळात अन्नदानच्या माध्यमातून आम्ही जेवणाची सोय करीत आहोत. हे आमचे भाग्यच आहे  असे मत व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे यांनी व्यक्त केले. 
 शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे, रुग्णांनी शहरातील दवाखाने भरलेले आहेत. रुग्ण,  नातेवाईक व त्यांच्या सेवेत कार्य करणारे यांना पौष्ठिक आहार मिळावा या उद्देशाने श्री स्वामी समर्थ अन्नसेवा मंडळाच्या माध्यमातून सकस दालखिचडी पार्सल सेवेचे सुरुवात बुधवारी  उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे सुरुवात करण्यात आली. त्यावेळी श्री  चिंचोळे बोलत होते.  विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. दिलीप सगर, माजी अध्यक्ष ॲड. प्रविण तोतला व अन्नसेवा मंडळाचे सदस्य यांच्या पुढाकाराने ही पार्सल सेवा सुरु करण्यात आली. यात  शहरातील सर्व खाजगी कोविड दवाखाने,कोविड सेंटर,उपजिल्हारुग्णालय ,शहरातील सर्व कोव्हीड रुग्णालयातील रुग्णांना व नातेवाईक यांना या सेवेचा लाभ घेता येईल. प्रथमतः श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोरोनाची महामारी  लवकरात लवकर संपून जाऊ देत अशी प्रार्थना स्वामींच्या चरणी करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासाठी आपली जागा उपलब्ध करून दिली. श्री चिंचोळे, ॲड. सगर, ॲड. तोतला, ॲड. मोहन  कोथिंबिरे, ॲड. अमित सांगावे, ॲड. शीतल चव्हाण, ॲड. अक्षय तोतला, ॲड. सिद्राम हंद्राळे,  माहेश्वरी संघटनेचे शहराध्यक्ष दिपक लाहोटी, बसवराज वरकले , माजी मुख्याध्यपक अनिल धारूरकर, अशोक पतगे, मधुकर गुरव , विनायकराव माने , श्रीकांत हेड्डा, बाबूभाई  बोअरवेलवाले , अमरसिंघ चौहान, आशिष भुतडा, शमीमसाब सास्तूरे, पिंटू कुलकर्णी आदी अन्नदाता सह नगरसेवक एम. ओ. पाटील व साखरे जलकुंभ यांच्यावतीने मोफत पाणी, दिग्विजय गॅस एजन्सीज यांच्या वतीने मोफत  गॅस सिलेंडर सेवा देण्यात येणार आहे. गोवर्धन गोशाळेचे सचिव विठ्ठल तेलंग, माहेश्वरी संघटनेचे तालुकाध्यक्ष  शिवप्रसाद लड्डा, उपाध्यक्ष श्रीकांत सोमाणी, मनीष सोनी, विष्णु पांचाळ, संजय लड्डा, विठ्ठलदास लड्डा, रामेश्वर सोमाणी, मुस्तफा इनामदार , करण काळे, निखिल पवार, स्वप्नील पवार, रोहन फुके, अंबादास पवार, व्यंकटेश थोरे, रवी नळदुर्गकर,  सागर नळदुर्गकर, चैतन्य कुलकर्णी,  आनंद रखेलकर, निनाद भडोळे,  दिपक राठोड आदीनी यासाठी परिश्रम घेत आहे.