देशव्यापी लसीकरण अभियान अधिक व्यापक,16 कोटीपेक्षा जास्त एकूण लसीकरण

16 कोटीपेक्षा जास्त एकूण लसीकरण करणारा भारत ठरला वेगवान देश
लसीकरण अभियानाच्या तिसऱ्या टप्यात 18-44 वयोगटातल्या 6.7 लाखाहून अधिक लाभार्थींचे लसीकरण
गेल्या 24 तासात 3.38 लाखाहून अधिक रुग्ण बरे 

नवी दिल्‍ली, 5 मे 2021

एका महत्वाच्या घडामोडीअंतर्गत, पीएम केअर्स फंडातून आर्थिक सहाय्य लाभलेली दोन वैद्यकीय ऑक्सिजन सयंत्र नवी दिल्लीतल्या एम्स आणि आरएमएल रुग्णालयात एका आठवड्यात बसवण्यात आली आहेत. ही सयंत्रे युद्धपातळीवर कोईमतूर इथून हवाईमार्गे आणून  काल बसवण्यात आली. आज संध्याकाळपासून या दोन्ही सयंत्रातून ऑक्सिजन पुरवठा सुरु होईल.

देशात कोविड-19 रुग्ण संख्येतली मोठी वाढ लक्षात घेऊन देशभरात 500 वैद्यकीय ऑक्सिजन सयंत्र बसवण्यासाठी पीएम केअर्स फंडातून निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन महिन्यात ही सयंत्रे उभारण्याचा मानस आहे. एम्स ट्रोमा सेंटर, डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालय (आरएमएल), सफदरजंग रुग्णालय, लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय आणि एम्स झझ्झर, हरियाणा इथे ऑक्सिजन सयंत्र बसवण्यात येणार आहेत.

भारतात लसीकरण अभियानाचा तिसरा टप्पा  व्यापक करण्यात आला असून देशात देण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी आज 16 कोटीचा टप्पा ओलांडला. भारताने केवळ 109 दिवसात हा महत्वाचा टप्पा गाठला आहे. हा टप्पा अमेरिकेने 111 दिवसात तर चीनने 116 दिवसात ओलांडला आहे.

12 राज्यातल्या 18-44 वयोगटातल्या 6,71,285 लाभार्थींनी कोविड प्रतिबंधक  लसीची पहिली मात्रा  घेतली. यामध्ये छत्तीसगड(1,026), दिल्ली (82,000), गुजरात (1,61,625), जम्मू काश्मीर (10,885), हरियाणा (99,680), कर्नाटक (3,840), महाराष्ट्र (1,11,621), ओडिशा (13,768), पंजाब  (908), राजस्थान (1,30,071), तामिळनाडू(4,577) आणि उत्तर प्रदेश (51,284) यांचा समावेश आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 23,66,349 सत्रांद्वारे  16,04,94,188  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये 94,62,505 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 63,22,055 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,35,65,728 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 73,32,999 फ्रंट लाईन कर्मचारी (दुसरी मात्रा ), 18-45 वयोगटामधले 6,71,285 लाभार्थी (पहिली मात्रा), 60 वर्षावरील 5,29,50,584 लाभार्थी (पहिली मात्रा ), 1,23,85,466 (दुसरी मात्रा ), 45 ते 60 वयोगटातल्या 5,33,94,353 (पहिली मात्रा ), आणि 44,09,213 लाभार्थी (दुसरी मात्रा ) यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.86% मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 14  लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 109 व्या दिवशी (4 मे  2021) ला 14,84,989 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 14,011 सत्रात 7,80,066 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 7,04,923 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

गेल्या 24 तासात 14  लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 109 व्या दिवशी (4 मे  2021) ला 14,84,989 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 14,011 सत्रात 7,80,066 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 7,04,923 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.एकोणीस राज्ये/केंद्रशासित प्रदेशात, राष्ट्रीय सरासरीपेक्षा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर जास्त आहे.

गेल्या 24 तासात 3,82,315 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 70.91% रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, हरियाणा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 51,880 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर कर्नाटक 44,631 आणि केरळमध्ये 37,190 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या 34,87,229 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 16.87% आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 81.25% रुग्ण 12 राज्यांमध्ये आहेत.

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.09%.आहे.

गेल्या 24 तासात 3,780 रुग्णांचा मृत्यू झाला.

यापैकी 74.97% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 891 जणांचा मृत्यू झाला, उत्तर प्रदेश मध्ये 351 जणांचा मृत्यू झाला.

सात राज्ये/केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये मेघालय,  दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली, त्रिपुरा, लक्षदीप, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि अंदमान आणि निकोबार यांचा समावेश आहे.

नवी दिल्लीतल्या एम्स इथल्या वैद्यकीय ऑक्सिजन सयंत्राची ही छायाचित्रे :