राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेबपोर्टलचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, ४ मे /प्रतिनिधी :- 

देशाच्या एकूण सकल उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा जवळपास १४ टक्के वाटा तर देशाच्या एकूण उत्पादनात १५ टक्के इतका वाटा आहे. उद्योग क्षेत्रात आपण अग्रेसर आहोत. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी वेळोवेळी आढावा घेवून योग्य नियोजन करणे हे आवश्यक असते. यासाठी मात्र औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची अचूक माहित असणे आवश्यक असते. ही अचूक माहिती वेबपोर्टलच्या माध्यमातून आता सहज उपलब्ध होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. या वेबपोर्टलचा शुभारंभ उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्ष सभागृहात ऑनलाईन पद्धतीने झाला. यावेळी ते बोलत होते.

या छोटेखानी समारंभास उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दिली. अपर मुख्य सचिव (नियोजन विभाग) देबाशिष चक्रवर्ती, अपर मुख्य सचिव  (उद्योग विभाग) बलदेव सिंह, संचालक  (अर्थ व सांख्यिकी संचालनालय) र.र. शिंगे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव (नियोजन विभाग) देबाशिष  चक्रवर्ती, यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर संचालक  (अर्थ  व  सांख्यिकी संचालनालय) र.र. शिंगे यांनी प्रास्ताविक केले. या प्रकल्पामुळे भविष्यात उद्योग विषयक महत्त्वाच्या आकडेवारीची उपलब्धता होईल. औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप या दृष्टीने या वेबपोर्टलच्या निश्चित उपयोग होईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या मनोगतात यावेळी सांगितले.

या प्रकल्पामुळे भविष्यात उद्योग विषयक महत्त्वाच्या आकडेवारीची उपलब्धता होईल. राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे व यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप या दृष्टीने यासाठी या वेबपोर्टलचा निश्चित उपयोग होईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांनी आपल्या मनोगतात केले.