निलंग्यातील गांधीनगर भागात पाणीटंचाई ,नागरिकांची तारांबळ

निलंगा,४ मे /प्रतिनिधी    निलंगा नगरपालिकेकडून  पाणी पुरवठा योजनेचे नवीन पाईपलाईनचे काम होण्याअगोदरच बोअर  बंद केल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. यावर गांधीनगर प्रभागातील नागरिकांनी आवाज उठवताच  तीन मे  पासून नवीन पाईप लाईन ला सुरुवात केली. पण गेली चार दिवसापासून प्रभागातील बोअर बंद असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
 निलंगा नगरपालिकेने चार दिवसाच्या अगोदरच शहरातील सर्व बोअरचे स्टार्टर काढून पाणीपुरवठा बंद केला आहे. यामुळे निलंगा शहरातील नागरिकांना अशा या कोरोनाच्या महामारी च्या साथी मध्ये सुद्धा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. निलंगा नगरपालिकेकडून नवीन कनेक्शनच्या सक्ती साठी  बोअर द्वारे सुरु असलेला सुरळीत पाणीपुरवठा बंद   केला आहे. नागरिक अडचणीत आणल्याशिवाय नवीन कनेक्शन घेणार नाही म्हणून बोअर बंद करण्यात आले.  याविषयी शुक्रवारी निलंगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांना विचारणा केली असता नवीन कनेक्शन घेणे बंधनकारक आहे असे सांगण्यात आले. याबाबत अगोदर पाईप लाईन तरी पूर्ण करा व नंतर बोअर बंद करा असे नागरिकांनी सुचवल्या नंतर  सोमवार दुपारी चार वाजल्यापासून गांधीनगर प्रभागात उर्वरित राहिलेल्या पाईपलाईन कामाला सुरुवात केली.