निलंग्यातील शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा  प्रेरणादायी उपक्रम,रुग्णालयास दिले वॉटर प्युरिफायर

निलंगा,४ मे /प्रतिनिधी   

 निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयास श्री. शिवाजी विद्यालय निलंगा येथील माजी विद्यार्थी व शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने व्हाट्सअप ग्रुपच्या  माध्यमातून सर्व  सदस्यांना आव्हान करून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पंचावन्न हजार रुपये किमतीचे आर. ओ. वॉटर प्युरिफायर  मशीन भेट देण्यात  आले.   

आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे हा हेतू ठेवून काम करणारे या ग्रुपमधील विद्यार्थी सर्वकाही निलंग्यात राहात नाहीत यापैकी साधारण सत्तर टक्के विद्यार्थी हे बाहेर आपल्या कामात  व्यापार, नोकरी च्या माध्यमातून पुणे मुंबईसारख्या ठिकाणी आहेत.काही विद्यार्थी तर येथील स्थानिक सुद्धा नाही तसेच निलंगा येथील काही मुलीचे लग्न होऊन आपल्या सासरी आहेत. अशांनी पण या ग्रुप मध्ये एका दिवसात भरपूर रक्कम जमा झाली व त्यातून  आपण काहीतरी आपल्या गावाचा देणे लागतो म्हणून या सर्वांनी हा उपक्रम राबविला.  या कामातून नक्कीच बाकी व्हाट्सअप ग्रुपला पण प्रेरणा मिळेल. यापुढे पण हा ग्रुप सार्वजनिक कामासाठी भरपूर निधी उपलब्ध आहे. लागला तर अजून जमा करून मदत करणार आहे. 

या कामासाठी शिवाजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी ग्रुपचे सदस्य   श्रीकांत तोष्णीवाल ,बाळू सोमाणी, किशोर भाऊ जाधव, श्री डाकरे सर  त्यांच्या पुढाकाराने हे कार्य सुरू आहे. व यापुढे पण राहील.  विशेष करून संतोष सिद्रामप्पा सोलापुरे यांच्या स्मरणार्थ सोलापुरे परिवार व जिवलग फाउंडेशन यांनी 26 हजार रुपयांची मदत या ग्रुपला केली आहे. शिवाजी विद्यालय ग्रुपने नक्कीच एक वेगळी संकल्पना निलंगा शहराला दिली आहे आज हे  आर ओ वॉटर फिल्टर वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे,  त्यांचे सहकारी श्रीमती काळे  , जगताप  तसेच पत्रकार प्रा.अभिमन्यू पाखरसांगवे, हरिभाऊ सगरे , असलम झारेकर यांच्या उपस्थितीमध्ये श्री बाळू सोमाणी, किशोर जाधव, श्रीकांत तोष्णीवाल  यांनी हा   वॉटर फिल्टर रुग्णालयास भेट दिला.