निलंगा:भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संजय सोरडे यांचे निधन

 निलंगा,३ मे /प्रतिनिधी: 

शहरातील मेडिकल दुकानदार व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संजय करबसप्पा सोरडे यांचे सोमवार दिनांक 3 मे रोजी दुपारी वयाच्या 52 व्या  वर्षी  दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर निलंगा येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.संजय सोरडे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

गेल्या 20 वर्षापासून ते लिंगायत समाजाच्या संगनबसव विरक्त मठाचे सचिव म्हणून काम करत होते. भाजपाच्या व लिंगायत समाजाच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेल्या संजय सोरडे यांचे अचानक  दुःखद निधन झाल्याने निलंगा शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.