परभणी महापालिकेने 17 दुकानदारांवर केली दंडात्मक कारवाई

परभणी ,३ मे /प्रतिनिधी :

परभणी शहरात महापालिकेच्या पथकाने दुकाने सुरू ठेवली याप्रकरणी 17 दुकानदारांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड तसेच विना मास्क फिरणाऱ्या 23 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत एकूण 89 हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल केला,

Displaying 03-16.jpg


परभणी शहरात सध्या लॉकडाउन  सुरू आहे, परंतु काही दुकानदार हे परवानगी नसतानाही दुकाने सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने परभणी महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात आहे. सोमवारी दिनांक 3 मे रोजीआयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार व सहाय्यक आयुहक्त अल्केश देशमुख यांच्या  नियंत्रणाखाली नानलपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे  तसेच तिब्बतवाड यांच्या सोबत संयुक्त कारवाई करत आज कच्ची बाजार जनता मार्केट शिवाजी चौक येथे आज अस्थपणा चालू ठेवल्याबद्दल 17 दुकानावर प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे 85 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
 व विना मास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली एकूण 23 नागरिकांवर कार्यवाही करित एकुण 4 हजार 600 व एकुण 89 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे, या कार्यवाही मध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड   प्रशिक्षणार्थी स्वच्छता निरीक्षक विनायक बनसोडे मुकादम भिमराव लहाने प्रकाश काकडे  इत्यादींचा सहभाग होता,