राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 75 लाखापेक्षा जास्त मात्रा उपलब्ध

भारत सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 16.54 कोटी मोफत मात्रा पुरवल्या

येत्या 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 60 लाख मात्रा मिळणार

नवी दिल्ली,३ मे /प्रतिनिधी 

कोविड-19 महामारी विरोधातल्या लढ्यात, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधत, सर्व विभागांमध्ये समन्वय राखत सुसूत्र दृष्टिकोनाचा अवलंब करत, केंद्र सरकार अग्रस्थानी आहे. चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक याबरोबरच लसीकरण हा या महामारी विरोधातल्या भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा अविभाज्य भाग आहे.

कोविड-19 लसीकरणाच्या व्यापक आणि वेगवान तिसऱ्या टप्याची 1 मे 2021 पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. नव्या पात्र वयोगटाच्या लसीकरणासाठीची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरु झाली आहे.  

केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 16.54 कोटी (16,54,93,410) मात्रा मोफत पुरवल्या आहेत. आज सकाळी आठ वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून एकूण 15,79,21,537मात्रा वापरण्यात आल्या.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 75 लाखापेक्षा जास्त (75,71,873) मात्रा वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.याशिवाय येत्या 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 59 लाखापेक्षा जास्त (59,70,670) मात्रा मिळणार आहेत.