सोमवारी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार,45 वर्षे वरील नागरिकांचे लसीकरण होणार नाही

औरंगाबाद ,२ मे /प्रतिनिधी ​

महानगर पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कोरोना लसीकरणास शहरातील 18 वर्ष  ते 44 वर्ष आतील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .    45 वर्षे वरील नागरिकांसाठी महानगर पालिके कडे सध्या लसींचा साठा उपलब्ध नाही.  त्यामुळे 45 वर्षे वरील नागरिकांचे  उद्या लसीकरण होणार नाही. त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली आहे . 

18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी मनपा च्या  मुकुंदवाडी ,सादात नगर आणि कैसर कॉलनी या आरोग्य केंद्रावर सकाळी 10 ते 4 यावेळेत  लसीकरण सुरू राहणार आहे . या लसीकरण केंद्रावर प्रत्येकी  100 लसी देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये . रोज रात्री रात्री 9.00 वाजता कोविन aap ची वेब साईट ओपन होणार आहे. या साईट वर नागरिकांनी लसीकरणास आपली नोंदणी करावी.असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.रोज रात्री 9.00 वाजता कोविन aap ची वेब साईट ओपन होणार आहे. या साईट वर नागरिकांनी लसीकरणास आपली नोंदणी करावी.असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.