महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन

Image

मुंबई, दि. १ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत  प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.