जालना :पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

जालना ,१ मे /प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले.

May be an image of standing

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटोकोरपणे पालन करुन ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व मोजक्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे आदींची उपस्थिती होती.