विद्यापीठात महाराष्ट्र दिन साजरा

औरंगाबाद ,१ मे /प्रतिनिधी ​

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते शनिवारी (दि.एक) ध्वजारोहण​ ​करण्यात आले. राज्य शासन आदेशाप्रमाणे ‘कोविड-१९‘च्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.
यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्र​ ​कुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मिक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.फुलचंद सलामपुरे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजिब खान, कार्यकारी अभियंता​ ​रवींद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.