महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण

धुळे,१ मे /प्रतिनिधी  : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. पोलिस दलाच्या तुकडीने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाचे या संदर्भातील नियम पाळून अत्यंत साधेपणाने ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे आदी उपस्थित होते. जगदीश देवपूरकर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.