कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा होणार

औरंगाबाद,३० एप्रिल /प्रतिनिधी  :- कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत निर्गमित करण्यात आल्या आहेत.

या सूचनेनुसार जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम विभागीय आयुक्त यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ८ वाजता होणार आहे. यावेळी निवडक अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड – १९ च्या अनुषंगाने दिलेल्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करत ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.