चिंताजनक !औरंगाबादेत २४ तासांत ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 1283 कोरोनामुक्त, 751 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 09 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 751 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 81 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2150 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.घाटीत सहा, खासगीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Are more virulent strains of coronavirus causing higher deaths in ...

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील आरिफ कॉलनीतील 55 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा आठ जून रोजी दुपारी तीन वाजता, रात्री 9.15 वाजता क्रांती चौकातील रमा नगरातील 83 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज 09 जून रोजी पहाटे दीड वाजता जाधववाडीतील 40 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित, सकाळी 7.15 वाजता युनुस कॉलनीतील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आणि साडे सात वाजता जहागीरदार कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित, सकाळी 10.30 वाजता जिन्सी परिसरातील 80 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात रोशन गेट येथील मुजीब कॉलनीतील 67 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा सकाळी आठ वाजता, अन्य एका खासगी रुग्णालयात गारखेडा परिसरातील 73 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा दुपारी साडे चार वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 88, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 27, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 116 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. वडगाव कोल्हाटी (1), बजाज नगर, मोरे चौक (3), पंढरपूर परिसर (1), बारी कॉलनी (2), रोशन गेट (3), कोहिनूर कॉलनी, पानचक्की जवळ(1), नागसेन नगर,उस्मानपुरा (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), मिल कॉर्नर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (3), असेफिया कॉलनी (1), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), जाधववाडी (1), पेठे नगर, निसर्ग कॉलनी (1), नारेगाव (1), एन-11, मयूर नगर, हडको (1), बिस्म‍िला कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (2), एन-आठ सिडको (1), हर्सुल परिसर (2), सिल्लेखाना, क्रांती चौक (1), बंजारा कॉलनी (2), कटकट गेट, शरीफ कॉलनी (1), एसटी कॉलनी, कटकट गेट (2), संजय नगर, बायजीपुरा (1), गणेश कॉलनी, मोहनलाल नगर (4), वसंत नगर, जवाहर कॉलनी (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (2), समता नगर (3), पडेगाव (1), रोहिणी नगर (1), न्याय नगर (1), गादिया ‍विहार (3), शिवाजी नगर (1), गारखेडा परिसर (3), अशोक नगर,एमआयडीसी, मसनतपूर (2), व्हीआयपी रोड, काळीवाडा (1), सिटी चौक (2), युनुस कॉलनी (1), नूतन कॉलनी (2), रवींद्र नगर (1), दशमेश नगर (1), अरिहंत नगर (1), विद्या नगर (1), एन चार , गुरू साहनी नगर (1), अंबिका नगर (1), पोलिस कॉलनी, मुकुंदवाडी (1), एन सहा, सिडको (1) कैलास नगर (2), रोकडा हनुमान कॉलनी (1), जटवाडा रोड परिसर (1), इंदिरा नगर (1), रमा नगर, क्रांती चौक (1), कैसर पार्क (1), सिडको (1), अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 28 महिला आणि 53 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1283 जण कोरोनामुक्त

मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *