चौंडी आत्मदहन प्रकरण:जिल्हाधिकारी -पोलिस अधीक्षक यांची चोंडीला भेट; ढवळे कुटुंबियांशी  केली चर्चा

नांदेड हादरले! सामाजिक कार्यकर्त्याने केले आत्मदहन - राजमुद्रा न्यूज लाईव्ह  !

लोहा / माळाकोळी,३०एप्रिल /प्रतिनिधी 

माती ,नाला- बंधारे तसेच हरिण व मोर हत्या प्रकरणात वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करूनही चौकशी झाली नाही .शेवटी आत्मदहन  करणारे सामाजिक कार्यकर्ते शिवदास शिवदास संभाजी ढवळे यांच्या कुटुंबीयाची चौंडी(ता लोहा) जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी भेट घेतली. त्यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे होते या दोन्ही अधिकाऱ्यांनी ढवळे कुटुंबियांचे सांत्वन केले .या प्रकरणाची चौकशी करू असे  कुटुंबास आश्वासित केले.तर  या प्रकरणात अट्रॉसिटी दाखल व्हावी , संबंधित विभागाच्या दोषींवर कडक कार्यवाही व्हावी आरोपीना तात्काळ अटक करावी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी मृत   ढवळे यांच्या कुटुंबाने केली आहे.
  चौंडी( ता लोहा) येथील सामाजिक कार्यकर्ते शिवदास संभाजी ढवळे यांनी वनविभागाकडे हरीण -मोर यांच्या हत्येची तसेच नाला बंधारे याच्या कामाची चौकशी करावी यासाठी जून २०२०पासून सातत्याने पत्र व्यवहार, निवेदने याद्वारे पाठपुरावा करीत होते .तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख व नांदेड वन उपसरक्षक यांच्या कडे १६ मार्च रोजी निवेदन दिले होते .आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आणि बुधवारी २८एप्रिल रोजी सकाळी वन विभागाच्या जागेत त्यांनी आत्मदहन केले या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली त्या पार्श्वभूमीवर चौंडी या गावी स्वतः जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर , जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे हे गेले होते त्यांनी मयत शिवदास यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेत   मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्ती व संस्था यांची सखोल चौकशी केली जाईल व  पिडीत कुटुंबाला न्याय दिला जाईल असे आश्वासित केले.पोलीस अधीक्षक श्री शेवाळे यांनी संपूर्ण चौकशी    केली जात आहे यात दोषींवर कार्यवाही होईल अटक केली जवळ असे कुटुंबांना संगीलते यावेळी त्यांचा सोबत उपविभागीय अधिकारी पी एस बोरगावकर, प्रभारी डीवायएसपी सचिन  सांगळे,   तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार राम बोरगावकर, माळाकोळीचे  सहाय्यक पोलिस अधिकारी  माणिक डोके , तसेच  सुदाम ढवळे तिरुपती ढवळे , मुलगा जनार्दन ढवळे सह चोंडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. मृत शिवदास ढवळे  धाडसी कार्यकर्ता होता .त्यांनी आत्मदहन केले तर इतरत्र जागा जळल्याचे कुठेही खुणा दिसत नाहीत यासह अनेक शंका उपस्थित केला जात आहेत
आत्मदहन की घातपात — वंचितचे निवेदन

Displaying IMG-20210429-WA0107.jpg

वंचितचे निवडणूक प्रमुख प्रा.राजू सोनाळे यांनी ढवळे कुटुंबीयांची भेट घेतली.जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जेव्हा   शिवदास ढवळे कुटुंबियांला भेट दिली त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे  प्रा राजू सोनसळे व कार्यकर्ते उपस्थित होते . जळीत हत्याकांड प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी .भा.द.वी. ३०२,१२० (ब) व अट्रोसिटी ऍक्ट अन्वये वाढीव गुन्हे दाखल करण्यात यावेत, नांदेड जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षकांसमोर  करण्यात आल्या.कुटूंबातील एका व्यक्तीस वन खात्यात नौकरी द्यावी. पत्नीस १० लाखाची आर्थिक मदत करण्यात यावी असे निवेदन दिले यावर  ,राहुल चिखलीकर ,अनिश ढगे अभय सोनकांबळे ,विनोद नरवाडे यांच्या सह्या आहेत.दिरंगाई झाली नसती तर घटना टळली असती ?असे प्रश्नचिन्ह पोलिसांच्या बाबत उपस्थित केले जात आहेत