जालना पालिकेतील कर विभागाच्या आगीत सर्व रेकॉर्ड जळून खाक

तिन्ही वॉचमन संशयाच्या भोवऱ्यात

जालना ,२९एप्रिल /प्रतिनिधी 

जालना पालिकेतील कर विभागाला रात्री उशिरा अचानक आग लागून सर्व रेकॉर्ड जळून खाक झाले. आग एवढी मोठी आग होती कि रेकॉर्ड जळून खाक होईपर्यंत आग विझविण्याचा कुठलाच प्रयत्न करण्यात न आल्यामुळे त्यावेळी ड्युटीवर असलेले तिन्ही वॉचमन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

जालना नगर पालिका इमारतीच्या 10 नंबरचा दालनात असलेल्या कर विभागाला बुधवारी रात्री अचानक आग लागली. आग एवढी भयावह होती की , कर विभागातील रेकॉर्डरूमधील जवळपास सर्वच रिकोर्ड अक्षरशः जळून खाक झालेय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब पोचण्यापूर्वी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारांसह घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण  मिळवले त्यावेळी नगर पालिकेत कर्तव्यावर हजर असलेले तिन्ही वॉचमन संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत.

मुख्याधिकारींनी संबंधित कार्यालय सील करण्याचे आदेश दिले असून  सकृतदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी ,अशी शंका उपस्थित केली जातेय.

याठिकाणी सीसीटीव्ही आणि अग्निशामक यंत्रणा कार्यन्वित असून सकाळी उजेडात नुकसानीची परत पाहणी करून पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करणार असल्याची माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी नार्वेकर यांनी दिली.