खासदार सुजय विखे यांनी विनापरवाना रेमडेसिवीर आणल्याप्रकरणी पोलिसांना तपास करण्याचे स्वातंत्र

औरंगाबाद खंडपीठात भाजपा खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात याचिका 

औरंगाबाद ,२८एप्रिल /प्रतिनिधी

अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे यांनी विनापरवाना रेमडेसिवीरआणल्याप्रकरणी पोलिसांना तपास करण्याचे स्वातंत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. बी यु देबडवार यांनी दिले आहेत. ही फौजदारी याचिका म्हणून नोंदविली जाऊ शकते की नाही याबाबत कोणताही निर्णय दिला नाही. 

Image

अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिवीर

इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला.  या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेमडेसिवीर साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही. सदर साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थान च्या रुग्णालयाला व राहता येथील सरकारी दवाखान्याला देखील देखील वाटप केले. 

१०,००० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ सुजय विखे यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी  केली असावी,  सदर  रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त/ शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब देखील कुठे नाही अश्या मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका करून सदर प्रकरणात खासदार डॉ सुजय विखे यांचावर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे.राजकीय स्टंट म्हणून मोठ्या प्रमाणात जबरदस्तीने  रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणण्यात आल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांनी नोंदविला आहे, जे दोन व्हिडिओंमध्ये रेकॉर्ड केले आहेत.

सदर रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शासनाने जप्त करावा व अहमदनगर जिह्यातील गरजू रुग्णांना जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या मार्फत समन्याय पद्धतीने वाटप करावी अशी विनंती याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आली.

उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. बी यु देबडवार यांच्यासमोर २६ एप्रिल रोजी सुनावणी झाली.जप्त केलेल्या  रेमडेसिवीर वायल्स पुढील आदेश  होईपर्यंत वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार जपून ठेवल्या पाहिजेत. असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.या  याचिकेची सुनावणी २९ एप्रिल  रोजी ठेवण्यात अली आहे. याचिकाकर्ते हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी कोर्टात सांगितले.

सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे व राजेश मेवारा यांनी काम पाहात आहे तर शासनाच्या वतीने डी. आर काळे  काम पाहात आहे.   

सुजय विखे यांना रेमडेसिविरचा साठा मिळाला कसा? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल 

Image

कोरोना संबंधित जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी सुजय विखे-पाटील यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत न्यायालयाने केंद्र सरकारकडे विचारणा केली. औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी आवश्यक ते आदेश दिलेले आहेत. 
राजकीय व्यक्तींना दहा हजार रेमडेसिविरचा साठा मिळतोच कसा? दिल्लीत रेमडेसिविरचा तुटवडा असताना तेथून हा साठा आणण्यासाठी परवानगी कोणी दिली? औषध कंपन्यांनी रेमडेसिविरचा साठा थेट केंद्र सरकारला उपलब्ध करणे आवश्यक असताना तो खासगी व्यक्तींना मिळतोच कसा? अशी प्रश्नांची सरबत्ती भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांच्या निमित्ताने उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला केली.
 एक राजकीय व्यक्ती खासगी विमानातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिविरचा साठा कसा काय आणू शकते, हे खासगी वितरण नाही का, असा प्रश्नही न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांना केला. सद्य:स्थितीला ज्याला या इंजेक्शनची गरज आहे त्याला ते मिळायला हवे, असेही न्यायालयाने सुनावले. 

सुजय विखे यांचे म्हणणे

Image

खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. काय आहे डॉक्टर विखे यांचे म्हणणे – कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेमडिसिव्हीरचा तुटवडा महाराष्ट्रामध्ये किंबहुना संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.अशा परिस्थितीत त्या इंजेक्शनबाबत होणारे राजकारण, आरोप-प्रत्यारोप या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आज विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलला देखील १०० इंजेक्शन देण्यात आले आहेत आणि ते देखील तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठीच वापरले जातील. तसेच प्रवरा हॉस्पिटल येथे २०० बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे, तेथील रेमडिसिव्हीर इंजेक्शन संपल्यामुळे तिथे देखील रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.राजकारणाच्या पलिकडे जाऊन लोकांचा जीव वाचवणं हे आम्हाला क्रमप्राप्त वाटतं, म्हणून त्या दृष्टिकोनातून कुठलाही भेदभाव न करता, कुठलाही पक्षपातीपणा न करता आमच्या कुटुंबाच्या वतीने जिल्ह्यासाठी ३०० रेमडिसिव्हीर सुपूर्द करण्यात आले.