प्रा. अमोल औटे यांचे निधन

निलंगा ,२७ एप्रिल /प्रतिनिधी 

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथील विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षक  प्रा.अमोल ओटे यांचे दिनांक 27 एप्रिल 2021 रोजी सकाळी अकलूज येथील खासगी रूग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या वर गेल्या  दहा – पंधरा दिवसापासून खाजगी  रुग्णालयात   उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. ते मूळचे  उदगीर  येथील रहिवासी होते. 

ते मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी येथे अध्यापनाचे कार्य करीत होते. त्यांनी केलेल्या विशेष मार्गदर्शना मुळे शेकडो विद्यार्थी देशपातळीवरील विविध नामांकित संस्थेत शिक्षण घेत आहेत, ते महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीच्या  जीपॅट व   नायपर सेलचे प्रमुख होते.अतिशय शांत प्रेमळ व होतकरू असे प्राध्यापक होते. त्यांनी त्यांच्या अध्यापन कौशल्यामुळे  शेकडो विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळविले  होते. त्यामुळे ते एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते, त्यांच्या जाण्यामुळे महाविद्यालयांमध्ये एक पोकळी निर्माण झाली असून ती भरून निघणे अशक्य असल्याची भावना महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केले. तसेच. औटे  कुटुंबावर  कोसळलेल्या या दुःखात महाराष्ट्र शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी,  प्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व माजी विद्यार्थी  सहभागी सहभागी असून आपण एक चांगल्या विद्यार्थिप्रिय सहकाऱ्याला मुकलो असल्याची भावना प्राचार्य डॉक्टर भागवत पौळ यांनी व्यक्त केले.