महाविकास आघाडी सरकारने निव्वळ राजकारण केले ,अपयश झाकण्यासाठी  उठसूठ केंद्राकडे  कशाला बोट दाखवता?-खासदार रावसाहेब दानवे यांची टिका 

रेमडिसिव्हिर इंजेक्शन्स द्या ऑक्सिजन द्या असे रडगाणे टोपे यांनी  सोडून दिले पाहिजे , टोपेंवर तोफ डागली 

जालना ,२४ एप्रिल /प्रतिनिधी 

करोनाच्या दुसर्‍या लाटेची  शक्यता मागच्याच वर्षी मार्च महिन्यात  सांगितली जात असताना त्याच्या उपाययोजना आरोग्य खात्याची त्यांनी  तयारी का केली नाही?,  निव्वळ राजकारण केल, आता आपल अपयश झाकण्यासाठी  उठसूठ केन्द्राकडे कशाला बोट दाखवता, केन्द्र सरकार सगळ्या राज्याना समानतेची वागणूक देत आहे जिथे रूग्ण जास्त तिथे पुरवठा अधिक होतो अशा शब्दांत भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिका केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. 
केन्द्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे शनिवारी ते जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.  

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा राजीनामा आम्ही मागत नाही  आम्हाला असे अजिबात राजकारण करायचे नाही पण आपण हात जोडतो, पाया पडतो तुम्ही रेमडिसिव्हिर इंजेक्शन्स द्या ऑक्सिजन द्या असे रडगाणे टोपे यांनी  सोडून दिले पाहिजे करोनाच्या दुसर्‍या लाटेची  शक्यता मागच्याच वर्षी मार्च महिन्यात  सांगितली जात असताना त्याच्या उपाययोजना आरोग्य खात्याची त्यांनी  तयारी का केली नाही? असा सवाल करत खासदार दानवे यांनी जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्यावर तोफ डागली.  
केन्द्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे शनिवारी ते जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकार तातडीने ऑक्सिजन प्लॅन्ट उभारू शकते पण तसे  न करता  प्रत्येक मंत्री वेगवेगळे वक्तव्य करत आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना आता तरी समज दिली पाहिजे संजय राऊत यांनी आता तरी राजकारण करणे सोडून दिले पाहिजे करोना महामारी रोखण्यासाठी राज्य शासन पूर्ण अपयशी ठरले आहे भंडारा, नाशिक व विरार या सगळ्या घटनेनंतर थोडा तरी बोध घ्यावा हात जोडून पाया पडून अशा घटना थांबणार नाहीत.नियम व कायद्याची प्रभावी अंमलबाजावणी करण्याची गरज असल्याचे दानवे म्हणाले. 
जालन्यात दहा हजार रेमेडीसेविर आणल्याचा आरोग्य मंत्री राजेश  टोपे यांनी केलेला दावा शंभर टक्के खोटारडेपणाचा आहे प्रत्यक्षात  आकडेवारी बघितली तर फक्त दिडशे इंजेक्शन्स आलेत यापूर्वी तीनशे ,साडे तीनशे आलेत जालन्यात आयसीयु बेड मध्ये आजच्या घडीला  साडेतीनशे रूग्ण आहेत त्यामुळे हे दहा हजार इंजेक्शन्स आले असतील तर तुटवडा कसा ? आज मोठ्या संख्येने  रूग्णांचे नातेवाईक इंजेक्शन्स साठी भटकत आहेत  थेट जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात त्यांनी  धाव घेतली. जिल्ह्यात या इंजेक्शन्स वाटपाचे राजकारण सुरू आहे विशिष्ठ तालुक्यासाठी म्हणजे घनसावंगी व अंबड या टोपेंच्या मतदारसंघासाठी जास्तीचे इंजेक्शन्स दिले जात आहेत त्याचा डेटा आपण लवकर जाहीर करतोय आपल्या आपल्या लोकांना इंजेक्शन्सचे वाटप सुरू आहे भेदभाव केला जात आहे असा आरोप दानवे यांनी यावेळी बोलताना केला. 
अनिल परब हे शंभर कोटी रुपयांचा हप्ता गोळा करणाऱ्या टोळीत आहेत असे भाजपचे म्हणने नाही तर वाझे याने स्पष्टीकरण दिले आहे .देशमुख यांच्यावरील कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार होते आहे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कारवाई केली असती तर कोर्टात जायची गरज नव्हती चौकशीत नक्की काहीतरी निष्पन्न झाले असल्याचे दिसते कायदा त्याचे काम करत आहे राष्ट्रवादीचे आंदोलन हे काही देशमुख यांचे निर्दोषत्व सिध्द करू शकत नाही असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.