भावांना लोखंडी रॉड, तलवारने जबर मारहाण ,आरोपींना न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद:
पोलिसात केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन घरात घुसून दोघा भावांना लोखंडी रॉड, तलवारने जबर मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी मंगळवारी (दि. 9) दिले.
मोहम्मद इसाक मोहम्मद शब्बीर (22), शेख नदीम शेख चॉंद (21, दोघे रा. सादात नगर, रेल्वे स्टेशन), अलताफ बेग उस्मान बेग (35), तब्बसून खन जावेद हसन खन (48, दोघे रा. मोमीनपुरा, लोटाकारंजा) अशी आरोपींची नावे आहेत.
प्रकरणात मोहम्मद काशीफोद्दीन सिदृीकी मोहम्मद नसीमोद्दीन सिद्दीकी (25, रा. मोमीनपुरा, लोटा कारंजा) याने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, 29 मे रोजी काशीफोद्दीन व त्याचा भाउ जेवण करित होते. तेंव्हा तिन ते चार व्यक्तींनी त्यांच्या घराचा दरवाजा जोर जोरात वाजवत होते. मात्र फिर्यादीने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आरोपींनी दारवाजावर लाथा मारत घरात शिरले. त्यांनी फिर्यादीसह त्याच्या भावाला आमच्या विरोधात केले ली तक्रार मागे का घेत नाहीत म्हणत लोखंडी रॉड व तलवारीने दोघा भावांवर हल्ला चढवित त्यांना गंभीर जखमी केले. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी चारही आरोपींना अटक करुन त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *