गांजा विक्री प्रकरणी दोघांना जामीन

औरंगाबाद:
गांजा विक्री प्रकरणात आरोपींनी दाखल केलेला नियमीत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.डी. साळुंके यांनी 15 हजारांच्या जातमुचक्यासह अटी व शर्तींवर मंजुर केला.
जयसिंग मानसिंग गुलमाडु व प्रमसिंग शामसिंग गुलमाडू (दोघे रा. तळ्याचीवाडी ता. खुलताबद) अशी आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक फुंदे हे सहकार्यांसह खुलताबाद परिसरात गस्त घालत असतांना जयसिंग व प्रेमसिंग गुलमडे हे दोघे भाउ गांजाची विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गुलमाडूच्या घरावर छापा मारला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता एका खोलीतील गोणपाटामध्ये त्यांना चार किलो 485 ग्रॅम गांजा सापडला. प्रकरणात खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान दोघा आरोपी भावांना पोलिसांनी अटक केली. तर न्यायालयाने दोघा अरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर आरोपींनी नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला.प्रकरणात आरोपींच्या वतीने किरण मगर यांनी काम पाहिले. त्यांना प्रियंका पठाडे आणि जिवन खंडागळे यांनी सहाकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *