औरंगाबाद जिल्ह्यातील 383812 जणांचे कोरोना लसीकरण

औरंगाबाद, – जिल्ह्यात दि.23 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 383812 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोरोना लसीकरण झाले असून दि.23 एप्रिल रोजी एकूण 12704 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 4893 जणांनी तर शहरात 7811 जणांनी लस घेतली असल्याचे जिल्हा लसीकरण संनियंत्रण अधिकारी डॉ.महेश लड्डा यांनी सांगितले आहे. आता पर्यंत ग्रामीणमध्ये 171271 जणांनी पहिला डोस घेतला तर 13138 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकुण 184409 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये 168941 जणांनी पहिला डोस घेतला तर 30462 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण 199403 जणांचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे.