कोविड सेंटरला बोअरवेल: पाणी समस्या सुटली

खा चिखलीकर यांची आश्वासनपूर्ती

लोहा  ,२३ एप्रिल /प्रतिनिधी 

शब्द दिला आणि त्याची पूर्तता होतेच असे नेहमीच  लोकनेते जिल्ह्यचे  खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संदर्भाने नेहमीच  जनसामान्यांच्या  चर्चा होते .त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय असला.दोन दिवसांपूर्वी लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली .पाणी समस्या त्यांना कळली त्यांनी तात्काळ बोअरवेल दिला त्याची आज शुक्रवारी पूर्तता झाली. आणि पाण्याचा प्रश्न मिटला     

सोमवारी जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते लोह्यातील  कोरोना रुग्ण व नातेवाईक याना दररोज १००जणांना जेवणाचे डब्बे देण्याचा….आधार गरजुना..या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयात जेथे की कोविड सेंटर सुरू आहे तेथे पाण्याची समस्या असल्याने डॉक्टर व कर्मचारी यांनी निदर्शनास आणून  दिले तेव्हा तात्काळ बोअरवेल पडण्याचे व विद्युत मोटर बसविण्याचे आश्वसन प्रतापरावांनी दिले   आज माजी नगराध्यक्ष भाजपा शहराध्यक्ष किरण वटटमवार , माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, नगरसेवक दता वाले, भास्कर पवार यांच्या यांनी नारळ फोडून बोअरवेलला सुरुवात केलीं.सांयकाळी बोअरवेल पाणी लागले आणि खा चिखलीकर यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली      यासाठीआणखी बोअर जास्त खोल टाकण्यासाठी  किरण वटटमवार, केशवराव मुकदम , दता वाले, भास्कर पाटील, डॉ मिलिंद धनसडे, डॉ राजेश पवार, डॉ दीपक मोटे, डॉ गणेश चव्हाण, दीपक कानवटे, सचिन मुकदम, सूर्यवंशी डॉ लोहारे यासह कर्मचारी मदतीला धावले आणि साडे सहाशे फूट बोअर टाकण्यात आला .या कोविड सेंटरची  पाणी समस्या या निमित्ताने सुटली .यात विद्युत मोटार व अन्य साहित्य प्रतापराव पाटील यांच्याकडून दिले जाणार आहे.एखादा शब्द दिला की त्याची पूर्तता जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील हमखास करतात हे या भागातील या मतदारसंघातील जनतेला चांगले माहीत आहे म्हणूनच त्यांना जनतेची नेहमीच साथ मिळते .मतदार संघात त्याचा नेहमीच संपर्क असतो असे सांगून .कधीतरी आठवण आल्यावर येणारे ते लोकप्रतिनिधी नाहीत असा टोला नाव न घेता   किरण वटटमवार , केशवराव मुकदम, नगरसेवक दता वाले, भास्कर पवार यांनी लगावला आहे