विरार इथल्या रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त , मदत जाहीर

नवी दिल्ली ,२३ एप्रिल /प्रतिनिधी 

पालघर जिल्ह्यातील विरार इथल्या  कोविड -19  रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांविषयी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत .

महाराष्ट्रात विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून प्रत्येकी रु.2 लाख रुपयांची  तर गंभीर जखमींना प्रत्येकी  50,000  रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे .