विरारमधील रुग्णालयात अग्नितांडव,१३ जणांचा होरपळून मृत्यू 

vallabh_1  H x

विरार ,२३ एप्रिल /प्रतिनिधी :

विरारमधील विजय वल्लभ कोविड केअर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

14 Covid Patients In ICU Killed In Maharashtra Hospital Fire

विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ही आग लागली आहे. अतिदक्षता विभागात एसीचा स्फोट होऊन ही आग लागली. या अग्नितांडवात १३ रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री ३ ते ३.३०च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते.

Not national news': Maharashtra minister Rajesh Tope on Virar hospital fire  which killed 13 | Hindustan Times

शुक्रवारी पहाटे तीन-सव्वा तीनच्या सुमारास अतिदक्षता विभागातील एसीच्या काॅम्प्रेसरचा स्फोट झाला आणि अतिदक्षता विभागात आग लागली. बघता बघता ही आग पसरत गेली.

या आगीची माहिती मिळताच आग विझवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. पोलीस प्रशासनाची लोकं घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. अग्निशमन दलाच्या एकूण १० गाड्या यासाठी प्रयत्नशील होत्या. अखेर ही आग विझवण्यात आली.

Virar | Fire breaks out at COVID-19 care center in Maharashtra's Virar, 13  patients dead; CM orders enquiry | Maharashtra News

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना संवेदनशील वक्तव्य केले. ‘राज्य स्तरावर या घटनेची चौकशी केली जाईल ही घटना काही राष्ट्रीय बातमी नाही’, असे विधान राजेश टोपे यांनी केले.

Maharashtra: Fire in Vijay Vallabh Hospital ICU Ward in Virar |  Maharashtra: कोरोना संकट के बीच दर्दनाक हादसा, हॉस्पिटल के ICU वॉर्ड में  लगी आग; 12 मरीजों की मौत | Hindi News, देश

रुग्णालयातील एसीचा स्फोट झाला. त्यावेळी आयसीयूत १७ रुग्ण होते. त्यातील १४  जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर आहेत. मी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. रात्री जवळपास दीड ते दोन वाजता ही घटना घडली. एकूण ९० रुग्ण होते. फायर ऑडिट वैगरे हा मुद्दा पुढचा आहे. मी आता इथे कोणाला काही मदत करता येते का ? हे बघायला आलो आहे. हे प्रश्न घेऊन बसणं किंवा मदत करणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे.