लातूरच्या विलासराव देशमुख मेडिकल कॉलेजच्या अतिदक्षता विभागात धोका टळला 

अतिदक्षता विभागात वीज खंडित झाल्याने रुग्णांना अत्यंत तत्परतेने दुसऱ्या ​वॉर्डात ​ हलवल्याने कोणालाही इजा झाली नाही     -डॉ. सुधीर देशमुख

लातूर,​२२ एप्रिल /प्रतिनिधी ​ 

येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेच्या अतिदक्षता विभागात मंगळवारी रात्री(दि.20) ​काही समस्या निर्माण होवुन काही कालावधीसाठी वीज पुरवठा खंडीत झाला होता मात्र येथे सजग असलेल्या आपत्ती व्यवस्थापन टिमने अत्यंत तत्परतेने काही रूग्णांना दुसऱ्या वॉर्डात तातडीने हालवून उपचार चालू ठेवले.

या काळात कोणालाही  कसलीही इजा होवु दिली नाही. यंत्रणा सजग असल्यामुळे त्यांनी तातडीने काही रूग्णांना दुसऱ्या ठिकाणी हालवुन उपचार सुरू ठेवले. अत्यंत जलदगतीने ही कार्यवाही झाल्याले कोणत्याही रूग्णाला इजा झाली नाही, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीयवैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी दिली आहे.