कोविड हॉस्पिटलमध्येच  वाढदिवस.. अन जगण्याची उमेद..

लोहा,२२एप्रिल /हरिहर धुतमल 

कोविड टेस्ट पॉझिटिव्ह ..अख्ख कुटूंब हताश..आपोआप डोळ्यातून धारा..त्यातच ऑक्सिजन लेव्हल कमी झालं ..तर मग  काही खरं नाही. असं भयभीत समाजमन..या काळात कोविड हॉस्पिटल वरदान  ठरताहेत..खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये . उपचार घेणाऱ्या एका रुग्णांचा स्वतः..कोविड रोगाचे तज्ज्ञ व या भागात “देवमाणूस ‘..अशी अनेकांच्या ह्रदयात स्थान मिळविले डॉ मिलींद धनसडे यांनी  रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये वाढदिवस साजरा केला  आणि घाबरलेल्या रुग्णाला जगण्याची उमेद आली.

कोविड काळात जेथे जिल्ह्यावरही रुग्ण व नातेवाईक यांची जीवघेणी धावपळ सुरू आहे..असा काळात लोह्यात सरकारी कोविड व तीन खाजगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार होताहेत ही धीर देणारी व्यवस्था पाहता लोहा कंधार पालम भागातील रुग्णांसाठी लोहा शहर ‘मिडिकेअर बनले “आहे..डॉ मिलिंद धनसडे यांनी मागील काळातील कोविड सेवा या भागातील रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी ‘ जीवदान देणारी ठरली तोच सेवाभाव सद्याही सुरू आहे.पुणे, मुंबई नांदेड येथून रुग्ण लोह्यात डॉ धनसडे यांच्याकडे कोरोना उपचार घेत आहेत .साई क्रिटिकल चे प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ  राजेश पवार,, जगदंबा चे प्रसिद्ध डॉ गणेश चव्हाण यांचामुळे शहर , आजूबाजूचे दोन तालुके, ग्रामीण भागासाठी  मोठी वैदयकीय सोय झाली आहे.या डॉक्टरांची सरकारी कोविड सेंटरला दररोज सकाळी राउंड असतो त्यामुळे तेथेही     मिडिकेअर खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये  कपिल बारबिंड उपचार घेत आहेत .ते थोडे कोविड झाला म्हणून घाबरलेत ..डॉ मिलिंद धनसडे  यांचे वैद्यकीय समुपदेशन रुग्ण व नातेवाईक याना धीरोदत्तपणे कोरोनाचा मुकाबला करण्याची ताकद देते  कपिल या रुग्णांच्या बाबतीत असेच झाले.  बंधू  फार्मासिस्ट आनंद धनसडे  यांचे मोठे पाठबळ यासाठी डॉ मिलिंद याना मिळते हे विशेष .शासकीय कोविड हॉस्पिटल मधील जवळपास सव्वाशे रुग्णाची तपासणी करून आल्या नंतर डॉ मिलिंद यांनी  कपिल यांचा हॉस्पिटलमध्येच स्वतः वाढदिवस साजरा केला..तुही ठणठणीत होणार ..असा विश्वास दिला..हे ऐकताच वकील कपिल यांच्या डोळे पाणावले त्यानी डॉक्टरांचे आभार मानले..या आजाराचे आपण”  देवदूत ” ..आहात अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली     .रुग्णांच्या मनातील भीती दूर करून जगण्याची ताकद देण्याचे काम या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ धनसडे यांनी केले .सरकारी व खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्यांचे  सर्व सहकारी” आपले ” रुग्ण बरे व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहेत    .कोविड रुग्ण सेवेत युवा कार्यकर्ता सचिन मुकदम यांनी स्वतःला वाहून घेतले आहे त्यांची सर्व डॉक्टर व रुग्ण नातेवाईक याना मोठी मदत होते आहे। सोबतच असे उपक्रम राबवून रुग्णांत  जगण्याची उमेद निर्माण केली जात आहे ..डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याला जनतेनी सलाम केला आहे.