राज्यात आजही कोरोनाचा उद्रेक, रुग्णांमध्ये मोठी वाढ

मुंबई ,१७ एप्रिल/प्रतिनिधी :

राज्यात 24 तासांत 67 हजार 123 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 419 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 56 हजार 783 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत.  रूग्णांची वाढती संख्या पाहाता केंद्र आणि राज्य सरकार अनेक महत्त्वच्या भूमिका बजावत आहेत.दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधिता आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. राज्यात सध्या १५ दिवसांची संचारबंदी सुरू आहे, मात्र तरी देखील रूग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत नाही. परिणामी राज्यात कडक लॉकडाउन जाहीर करण्याचेही मंत्र्यांकडून बोलले जात आहे.

मुंबईत आज 8 हजार 834 नव्या कोरोना  रूग्णांची नोंद झाली आहे.  धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 52 जणांचा बळी गेला आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.  नागपुरात आज  6 हजार 959 नवे कोरोनाबाधित रूग्ण , 79 रूग्ण  मृत्यूंची नोंद झाली.आज दिवसभरात ५६ हजार ७८३ रूग्ण बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,६१,१७४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.१८ टक्के एवढे झाले आहे.

भारतातील सक्रीय बाधित रूग्णसंख्या आता 16,79,740 वर पोचली आहे. देशातील एकूण बाधित  रुग्णांपैकी 11.56% रूग्ण सक्रीय आहेत. गेल्या 24 तासांत, बाधित रूग्णसंख्येत 1,09,997  सक्रीय रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली. देशभरातील एकूण  बाधित रुग्णांपैकी 65.02% सक्रीय रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड,उत्तरप्रदेश, कर्नाटक, आणि केरळ या पाच  राज्यांत आहेत.देशातील एकूण सक्रीय  रुग्णांपैकी 38.09% रूग्ण केवळ महाराष्ट्रात आहे.राज्यातील मृत्यू दर १.५९ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ९७० रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.


जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा भाग असलेल्या, देशभरातील लसीकरणाने  कोविड -19 च्या लसींच्या जवळपास 12 कोटींच्या एकूण मात्रा देण्याचे काम पूर्ण केले आहे.   

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 17,37,539  सत्रांद्वारे  11,99,37,641  लसींच्या मात्रा देण्यात आल्या.यापैकी 91,05,429 आरोग्य कर्मचाऱ्यांनी (HCW) लसीची पहिली मात्रा घेतली,   56,70,818  आरोग्य कर्मचाऱ्यांनी (HCW) लसीची दुसरी मात्रा घेतली,1,11,44,069, आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW,पहिली मात्रा ) तर 54,08,572 आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW,लसीची दुसरी मात्रा), वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या  4,49,35,011 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा,तर 34,88,257 लाभार्थ्यांना दुसरी  मात्रा , तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,92,23,975  लाभार्थ्यांना (पहिली मात्रा)  तर 9,61,510 लाभार्थ्यांना (दुसरी मात्रा) अशा एकूण लसींच्या मात्रा देण्यात आल्या .

गेल्या 24  तासांत  एकूण 30 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या.काल ( दिनांक  16 एप्रिल 2021)या लसीकरणाच्या 91- व्या दिवशी 30,04,544 लसींच्या मात्रा  देण्यात आल्या. त्यात 37,817, सत्रांतून  22,96,008,लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा  देण्यात आली, तर 7,08,536  लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.