ब्रेक द चेन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात कडक निर्बंध लागू

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आदेश

औरंगाबाद दि 15 : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबादचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथ रोग अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्‍वये औरंगाबाद जिल्ह्यात (पोलिस आयुक्‍त औरंगाबाद (शहर) यांचे कार्यक्षेत्र वगळून) दिनांक 01 मे, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. अखेर संचारबंदी लागू राहणार असल्याचे आदेशाव्दारे कळविले आहे. या आदेशातील खालील नमूद इतर सर्व बाबी हया संपुर्ण औरंगाबाद जिल्‍हयासाठी (शहरासह) लागू राहतील.

सदरील आदेश अंमलात असतांना पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे. त्‍याचप्रमाणे अत्‍यावश्‍यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधीत राहिल. या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्यास्तव औरंगाबाद महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधीत वार्डाचे वार्ड अधिकारी व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधीत अधिकारी, तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्‍त लॉकडाऊन पर्यवेक्षक/मंडळ अधिकारी/अव्‍वल कारकून यांना संबंधीत पोलीस हवालदार व त्‍यापेक्षा वरीष्‍ठ दर्जाचे पोलीस अधिकारी, विविक्षीतपणे नेमलेले अधिकारी/कर्मचारी, ग्राम व नगर विकास विभागाचे सर्व अधिकारी/कर्मचारी आणि महसूल अधिकारी/कर्मचारी या आदेशाची नोंद घेऊन त्‍याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत दक्षता घेतील व आवश्‍यक कार्यवाही करतील. उपरोक्‍त अधिकारी/कर्मचारी यांना पोलीस ठाणे प्रमुखांशी समन्‍वय ठेवून संपूर्ण लॉकडाऊन आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीस /संघटना /आस्‍थापना विरुध्‍द गुन्‍हा दाखल करण्‍यास व अनुषंगिक दंडात्‍मक कारवाई करण्‍यास खालील यंत्रणेस प्राधीकृत करण्‍यात येत आहे.

महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत.तसेच महाराष्‍ट्र शासनाचे इतर विभाग जसे अन्‍न व औषध प्रशासन, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभाग, परिवहन विभाग, पुरवठा विभाग इत्‍यादींचे अधिकारी यांचा पथकामध्‍ये समावेश राहिल. या संबंधात जिल्‍हाधिकारी यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे या इतर विभागांचे अधिकारी कार्यवाही करतील. नगरपालिका/नगरपंचायत हद्दीत नगरपालिका/नगरपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत.गावपातळीवर ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत.

सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (Incident Commander)/ सहायक पोलीस आयुक्‍त यांचेकडे सादर करावे. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (Incident Commander) / सहायक पोलीस आयुक्‍त यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.

सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्‍द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल.वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांच्‍यावर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.

1) फौजदारी प्रक्रिया संहिता (Cr.P.C.)कलम 144 आणि रात्र संचारबंदी लागू करणे : (Imposition of Section 144 and Night Curfew)

• औरंगाबाद जिल्हयामध्ये दिनांक 14 एप्रिल, 2021 रोजी रात्री 8.00 वाजलेपासून दिनांक 01 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यत कलम 144 लागू करणेत येत आहे. • कोणत्याही नागरिकांस सार्वजनिक ठिकाणी योग्य कारण असल्याशिवाय फिरण्यास प्रतिबंध असेल. • या आदेशामध्ये नमूद केलेल्या व सूट देणेत आलेल्या अत्यावश्यक सेवा / आस्थापना यांच्या व्यतिरिक्त सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, सेवा या बंद राहतील. • या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ असलेल्या सेवा आणि आस्थापना यांना सूट देणेत आलेली असून त्यांच्या दळण वळण व प्रक्रिया सुरू ठेवणे विषयी कोणतेही बंधन असणार नाही. • या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अपवादात्मक वर्गवारीमध्ये समाविष्ठ केलेल्या सेवा आणि आस्थापना यांना कामाच्या दिवशी सकाळी 7.00 वा. ते रात्री 8.00 वा. या दरम्यान सुट देणेत आलेली असून त्यांच्या दळण वळण व प्रक्रिया सुरू ठेवणे विषयी नमूद केलेल्या कालावधीमध्ये प्रतिबंध असणार नाही. • अपवादात्मक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या वाहन चालक , घरेलू कामगार यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्‍यासाठी स्थानिक प्रशासनाची (महानगर पालिका, नगर पालिका,नगरपंचायत, ग्रामपंचायात ) परवानगी घेणे आवश्यक राहील.

2) अत्यावश्यक सेवेमध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल

• रुग्णालय, रोग निदान केंद्र, चिकित्‍सालय , लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगीक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत कच्चा माल उद्योग आणि अनुषंगीक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल. • शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा, दवाखाने, पशु संगोपन केंद्र व पशु खादयाची दुकाने. • किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई / चॉकलेट / केक/ खाद्य/‍मटन, चिकन, अंडी, मासे इ. दुकाने.• शितगृहे आणि साठवणुकीची गोदाम सेवा • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.• स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व सेवा. • स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा . • रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा • सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था , स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ• दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी• मालाची / वस्तुंची वाहतूक. • पाणीपुरवठा विषयक सेवा • शेती संबंधित सेवा आणि शेतीशी निगडीत सर्व कामामध्ये सातत्य राहावे याबाबत शेतीकामासाठी लागणाऱ्या सर्व अनुषंगीक सेवा, बी-बियाणे, खते, औजारे आणि त्यांची दुरूस्ती सेवा यांचाही समावेश असेल.• सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची व उत्‍पादनाची आयात – निर्यात • ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत) • मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा • पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा • सर्व प्रकारच्या कार्गो सेवा• डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा सेवा • शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा • विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा • ATM’s• पोस्टल सेवा • कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक) • अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा• सर्व ऑप्‍टीकल्‍स् शॉप. • वाहतूक व्‍यवस्‍थेशी निगडीत टायर विक्री, रिपेअर वर्क शॉप, सर्व्‍हीस सेंटर व स्‍पेअर्स पार्ट विक्री आस्‍थापना .वर नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्ती / अंमलबजावणी संस्था यांनी खालील सर्व समावेशक तत्वांचे पालन करणे आवश्यक राहिल.1) सर्व अंमलबजावणी करणारे अधिकारी / प्राधिकरण यांनी प्रतिबंध हे लोकांच्या आवागमनशी संबंधित आहेत, परंतु वस्तु आणि मालाची आवक जावक नेहमीप्रमाणे सुरू राहिल याची नोंद घेणेत यावी. 2) या आदेशात नमूद केलेल्या सेवा देणाऱ्या कामगारांच्या आवागमना साठी या आदेशात 1 मध्ये नमूद केले नुसार वैध राहतील.

3) अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळ काळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जातील. महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक सेवा या अत्यावश्यक सेवा समजल्या जातील हे तत्व लक्षात ठेवावे.

3) या आदेशात नमूद केलेनूसार अत्यावश्यक सेवामध्ये समाविष्ठ सर्व दुकाने यांनी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे : (Essential Category) • अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानाच्या ठिकाणी दुकान मालक व दुकानामध्ये काम करणारे सर्व कामगार वर्ग तसेच सर्व ग्राहक यांनी संबंधित दुकान परिसरामध्ये कोव्हीड19 योग्य वर्तनाचे Covid Appropriate Behavior (CAB) उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

• अत्‍यावश्यक सेवा देणारे दुकांनाचे मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग यांचे भारत सरकारकडील निकषानुसार लवकारत लवकर लसीकरण करून घेणेत यावे. सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानामध्ये ग्राहकांशी संवाद साधताना सुरक्षा उपायांचे जसे की, पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय जसे की, फेसशिल्ड व ग्राहकांकडून ई पेमेंटद्वारेच रक्कम स्वीकारणे इत्यादीचे पालन करणेत यावे. • अत्यावश्यक सेवामध्ये काम करणारे दुकानमालक, कामगार वर्ग किंवा कोणताही ग्राहक कोव्हीड उपाययोजनांचे पालन करत नसल्याचे निर्दशनास आल्यास त्यांचेकडून प्रथम अपराधासाठी रक्कम रुपये 500/- दंड वसूल केला जाईल. तसेच दुकान आस्थापना यांचेकडून कोव्हीड उपाययोजनांचे भंग झालेस दुकान आस्थापनेकडून रक्कम रुपये 1000/- दंड वसूल केला जाईल. पुन्हा – पुन्हा नियमांचे भंग करत असल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित आस्थापना ही कोव्हीड -19 आपत्ती अधिसूचना संपेपर्यत बंद करणेत येईल. • अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्‍ट असलेल्या आस्थापनामध्ये सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या आवागमन या आदेशात 1-ब मध्ये नमूद केलेनुसार वैध राहतील. • या आदेशामध्ये 2- मध्ये नमूद केलेनूसार किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने एकत्रित असलेल्या ठिकाणी मोठया प्रमाणात लोक एकत्र येत आहेत अशा ठिकाणाबाबत स्थानिक प्रशासनाने योग्य ती अनुषांगिक उपाययोजना करून तसेच त्यांच्या चालू राहणेच्या वेळा निश्चित करून देणे. कायमस्वरूपी त्या ठिकाणी नसलेल्या वरील सेवाबाबत खुल्या सार्वजनिक जागा शोधून त्या ठिकाणी त्यांना सेवा देणेबाबत जागा नेमून देता येतील. स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा ची ठिकाणे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत होणार नाहीत, याबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. स्थानिक प्रशासनास आवश्यकता भासल्यास वरील सेवाबाबत काही सार्वजनिक ठिकाणे ही कायमस्वरूपी बंद करता येतील. • सद्यस्थितीत बंद असलेल्‍या सर्व दुकानाचे चालक / मालक तसेच कर्मचारी यांचे लसीकरण भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार करुन घेण्‍यात यावे. सदर आस्‍थापनांनी भविष्‍यात दुकाने सुरु करण्‍याच्‍या दृष्‍टीने कोविड-19 संदर्भात सुरक्षा उपाययोजना म्‍हणून पारदर्शक काच अथवा इतर साहित्‍यांचे कवच तसेच ऑनलाईन पेमेंट सुविधा इत्‍यादीद्वारे ग्राहकांशी कमीत कमी संपर्क येईल याबाबत पूर्वनियोजन करावे.

3.1 ) भाजीपाला, फळे व अन्‍नधान्‍य यासाठी समन्‍वय अधिकारी म्‍हणून खालील अधिका-यांची नेमणूक करण्‍यात येत आहे.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री. अनिल दाबशेडे जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था, औरंगाबाद 954577555502 डॉ. तुकाराम मेाटे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद 942275160003 श्री. सखाराम पानझडे शहर अभियंता, महानगरपालिका औरंगाबाद 9823074025

4) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था – (Public Transport)सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खालील निर्बधांचे पालन करत, पूर्ण क्षमतेने सुरू राहिल. ऑटो रिक्षा चालक + फक्त 2 प्रवासी टॅक्सी ( चारचाकी वाहन) चालक + वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50 % (प्रादेशिक परिवहन विभागाकडील नियमानुसार )बस प्रादेशिक परिवहन विभागाकडील नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतके प्रवासी .कोणत्याही परिस्थितीत उभा राहून प्रवास करणेस प्रवाशांना परवानगी असणार नाही. • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी काटेकोरपणे योग्य पध्दतीने मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लघंन करणारे प्रवासी रक्कम रुपये 500/- दंडास पात्र राहतील. • चारचाकी टॅक्सी मध्ये जर एखाद्या प्रवाशांने मास्क वापरला नसेल, नियमांचे उल्लघन करणारा तो प्रवासी आणि चालक हे प्रत्येकी रक्कम रूपये 500/- दंडास पात्र राहतील. • प्रत्येक वेळी प्रवास पूर्ण करून आलेल्या वाहनांचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक राहिल. • सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे भारत सरकारकडील निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घ्‍यावे. महारा शासनाने निर्गमित केलेल्‍या कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचनांप्रमाणे /Covid Appropriate Behavior (CAB) चालक यांनी त्‍यांच्‍या व प्रवासी यांचेमध्‍ये प्लास्टिक शिट लावून स्‍वतःला आयसोलेट करावे.• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत कर्मचारी वर्गाच्या आवागमन या आदेशामध्ये 1-मध्ये नमूद केलेनुसार वैध राहतील. • रेल्वेबाबत, रेल्वे प्रशासनाकडून प्रवासादरम्यान कोणताही प्रवासी रेल्वेच्या सामान्य डब्यामधून उभा राहून प्रवास करणार नाहीत, आणि सर्व प्रवासी मास्क वापरतील याची खात्री करावी. • रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मास्क न वापरणे, कोव्हीड उपाययोजनांचे पालन न केलेस रक्कम रुपये 500/- दंड आकारला जाईल. • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवणेबाबत यापूर्वी काही अटीवर परवानगी देणेत आलेली आहे. सदरबाबत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेशी निगडीत अनुषांगिक सेवा यांचाही यामध्ये समावेश करणेत येत आहे. विमानतळावर आवश्यक असलेल्या मालवाहतूक, तिकिट व्यवस्था या अनुषंगिक सेवांचाही यामध्ये समावेश असेल.• ज्या व्यक्ती रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असतील, त्यांना अधिकृत तिकिट स्वत: जवळ बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत विमानतळ / बसस्थानक / रेल्वे स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.

अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक

01 श्री.संजय मेत्रेवार प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद 989231822502 अरुण शिया विभागीय नियंत्रक, म.रा.प.म.औरंगाबाद 9420182745

5) सुट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना : (Exemption Category)

5.1) खालील नमूद कार्यालये ही सूट देणेत आलेल्या वर्गवारीमध्ये समाविष्ठ असतील. • केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व संविधानिक प्राधिकरणे व संस्था • सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बॅका, सार्वजनिक उपक्रम • अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची सर्व कार्यालये • विमा आणि मेडीक्लेम कार्यालये • औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालये जी, उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. • रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया यांचेमार्फत नियंत्रित स्वंतत्र कार्यकक्ष असलेले प्राथमिक वितरक, CCIL, NPCI,पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि RBI कडून नियंत्रित बाजारामध्ये समाविष्ठ असलेले सर्व आर्थिक बाजार • सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे• सर्व मायक्रो फायनान्स संस्था• न्यायालय, लवाद अथवा चौकशी समिती यांचेशी संबंधित सर्व वकीलांची कार्यालये, सी.ए. यांची कार्यालये वित्‍तीय संस्‍थेशी संबंधित कार्यालये. • वर नमूद कार्यालये ही आवश्यक असलेला कमीत कमी कर्मचारी वर्ग किंवा क्षमतेच्या 50 % पर्यत कर्मचारी उपस्थित राहून सुरू राहतील. पंरतु कोव्हीड -19 आपत्तीमध्ये कामकाज करत असलेली सर्व शासकीय कार्यालये / सेवा या बाबीमधून वगळणेत आलेल्या आहेत. • या कार्यालयामध्ये हजर राहणेसाठी जाणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या आवागमन या आदेशामध्ये 1 मध्ये नमूद केलेनुसार वैध राहतील.• स्थानिक आपत्ती प्राधिकरण त्यांना आवश्यक असलेल्या सेवा यामध्ये समाविष्ठ करतील. • अभ्यागताना सदर कार्यालयामध्ये प्रवेश प्रतिबंधित असेल आणि कार्यालय परिसरामध्ये असलेल्या कर्मचारी / अधिकारी यांच्याव्यतिरिक्त इतरांच्या उपस्थित घ्यावयाच्या सर्व बैठका या ऑनलाईन पध्दतीने घेणेत येतील. • सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे लसीकरण भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर करून घेणे अनिवार्य आहे. जेणेकरून कोव्हीड -19 विषाणूचा संसर्ग कमी होवून कार्यालये पूर्ववत सुरु करता येतील.

5.2) खाजगी वाहतूक व्यवस्था : (Private Transport)• खाजगी वाहने तसेच खाजगी बस सेवा या अत्यावश्यक सेवेसाठी तसेच या आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणासाठी सुरू राहतील • नियमांचे उल्लघन करणारा व्यक्ती रक्कम रूपये 1000/- दंडास पात्र राहतील. • खाजगी बस सेवा ही खालील प्रमाणे सुरू राहतील. • खाजगी बसेस मधून बसणेच्या क्षमते इतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. उभा राहून एकाही प्रवाशाला प्रवास करणेस परवानगी असणार नाही. • सर्व खाजगी वाहतूक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे भारत सरकारकडील निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करणेत यावे आणि कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना वाहनांमध्ये प्रर्दशित करणे अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री.सुरेश वानखेडे सहायक पोलिस आयुक्‍त, वाहतुक औरंगाबाद 982370836302 श्री.स्‍वप्‍नील माने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद 9960005421

5.3) रेस्टॉरंट बार आणि हॉटेल्स विषयक : (Restaurants, Bars, Hotels)• सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार हे एकत्रित बसून सेवा देणेस बंद राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंट आवारामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत प्रवाशांसाठी रेस्टॉरंट आणि बार सेवा सुरू राहतील.• हॉटेल, रेस्टॉरंट व बारसाठी फक्त घरपोच सेवा सुरू राहतील. कोणासही हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मध्ये सेवा घेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. • हॉटेल मध्ये असलेले रेस्टॉरंट आणि बार हे हॉटेल अंतर्गत वास्तव्यास असलेल्या प्रवाशांसाठी / पाहुण्यांसाठी सुरू राहतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेरच्या प्रवाशांसाठी हॉटेल सेवा देता येणार नाही. बाहेरील लोकांनी हॉटेल व रेंस्टॉरंटसाठी वर नमूद केलेनूसार प्रतिबंधाचे पालन करावे लागेल. या आदेशामध्ये नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा अथवा सुट देणेत आलेल्या कार्यालयातील सेवा बजावणेसाठी जात असलेल्या प्रवाशांसाठी फक्त आवागमन करणे वैध असेल. • घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे भारत सरकारकडील निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे.• एकापेक्षा जास्त कुटुंबातील इमारतीमध्ये घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गाची हालचाल प्रवेशव्दारा पर्यत नियंत्रित असेल आणि आतील सेवा संबंधित गृहनिर्माण संस्‍थेने नियुक्त केलेल्या संबंधित कर्मचारी वर्गामार्फत पोहोच केल्या जातील. याअनुषंगाने सर्व घरपोच सेवा देणारा कर्मचारी वर्ग आणि इमारती मधील कर्मचारी वर्ग यांनी कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक असेल. • सदर नियमाचा भंग करणारी व्यक्ती याबद्दल रक्कम रुपये 1000/- दंडास पात्र राहिल आणि संबंधित आस्थापनेकडून रक्कम रूपये 10,000/- दंड आकारला जाईल. वारंवार या सूचनेचा भंग केल्यास वा असे कृत्य वारंवार घडल्यास सदर आस्थापनेचा परवाना आणि सदर प्रक्रियेबाबत देणे आलेली परवानगी कोव्हिड-19 साथीची अधिसूचना आहे तो पर्यंत रद्द करण्यात येईल.• भारत सरकारकडील निकषाप्रमाणे सर्व रेस्टॉरंट आणि बार आस्थापनामध्ये काम करणारे व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणूचा संसर्ग कमी होवून शासनास रेस्टॉरंट आणि बार सुरू करणे बाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री.सुधाकर कदम अधिक्षक, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, औरंगाबाद 758812014202 श्री.एस.व्‍ही.कुलकर्णी सहा.आयुक्‍त, अन्‍न व औषध प्रशासन, औरंगाबाद 9420401403

5.4) उत्पादन क्षेत्र : (Manufacturing Sector)

5.4.1) खालील उत्पादन क्षेत्रे ही वेगवेगळया शिफटमध्ये आवश्यकतेनुसार सुरु राहतील.• या आदेशामध्ये नमूद अत्यावश्यक सेवा सुरु राहणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उत्पादन कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.• निर्यात मागणी पूर्ण करणेसाठी आवश्यक निर्यात विषयक उत्पादन पुरवठा करणारे सर्व उद्योग सुरु राहतील.• तात्काळ बंद न करता येणारे आणि तात्काळ मर्यादित वेळेमध्ये सुरु न करता येणारे सर्व उद्योग हे दिलेल्या वेळेमध्ये 50% क्षमतेने सुरु राहतील. उद्योग विभाग, औरंगाबाद जिल्हा यांचेकडून वर नमूद कोणताही उद्योग संबंधित नियमाचे भंग करीत नसलेबाबत आणि, कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करत असलेबाबत तपासणी करतील. सदर उद्योग हे मोठया प्रमाणात ऑक्सिजनचा वापर करणारे नसावेत, जे की फक्त अत्यावश्यक सेवा संबंधित उत्पादन करणारे असावेत.त्याचबरोबर संबंधित उद्योगानी त्याच्या कामगाराची राहणेची व्यवस्था, संबंधित उद्योग परिसरामध्ये किंवा एका स्वतंत्र ठिकाणी करणेची आहे.जेणेकरुन कामगारांचे अवागमन किंवा येणे जाणे हे कोणत्याही इतर नागरिकांशी संपर्क न येता करणे सोयीचे होईल.

5.4.2) वरील सर्व उद्योगानी त्यांचे कामगारासाठी राहणेची सुविधा कामाचे ठिकाणी उपलब्ध करणे किंवा स्वतंत्र अलगीकरण असलेल्या ठिकाणी करावी जेणेकरुन कामगाराच्या आवागमन या कोणाशी ही संपर्क न येता होतील. बाहेरुन येणा-या फक्त 10% व्यवस्थापकीय कर्मचारी राहू शकतात. सदर आधिसूचना संपेपर्यत कामगाराना कामाच्या ठिकाणाच्या क्षेत्राबाहेर आवागमन करता येणार नाहीत. सदर उद्योग हे त्यांना आवश्यक असलेल्या शिफ्ट मध्ये सुरु राहतील. 5.4.3) उदयोगामध्ये कार्यरत व्यवस्थापकीय व इतर कार्यरत कर्मचारी अधिकारी यांचे भारत सरकारकडील निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करणेत यावे. उदयोगाच्या ठिकाणी लसीकरणासाठी भारत सरकारकडील पात्रतेच्या निकषात घट होत असल्यास तात्काळ लसीकरण करण्याचे आहे. 5.4.4 ) वर नमूद अटींवर सुरु असलेले कारखाने आणि उत्पादक उदयोग यांनी खालील नमूद शिस्तीचे पालन करणे आवश्यक राहिल. • सर्व कामगारांचे कामाच्या ठिकाणी प्रवेश देण्याअगोदर शरीराराचे तापमान तपासावे आणि त्यांचेकडून महाराष्‍टू शासनाने निर्गमित केलेल्‍या कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचनांप्रमाणे /Covid Appropriate Behavior (CAB) उपाय योजनांचे पालन केले जात आहे हे तपासावे.• जर एखादा कामगार किंवा कर्मचारी वर्ग कोविड 19 पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या संपर्कातील सर्व कामगारांचे कारखाना प्रशासनाने स्वखर्चाने अलगीकरण करावे.• 500 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखाना किंवा उदयोगाच्या ठिकाणी त्यांनी स्वत:चे अलगीकरण केंद्र तयार करावे. सदर केंद्रावर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध उपलब्ध करुन देण्यात याव्यात आणि जर सदर अलगीकरण केंद्र हे कारखाना परिसराच्या बाहेर असल्यास बाधित व्यक्तींची ने-आण करताना ते इतर नागरिकांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घेणे. • जर एखादा कामगार कोविड 19 पॉझिटिव्ह आल्यास सदर कारखाना युनिट पूर्ण निर्जंतूक करेपर्यंत बंद करण्यात येईल. • गर्दी टाळण्यासाठी दुपारचे जेवण आणि चहाच्या वेळा वेगवेगळया करण्‍यात याव्‍यात. तसेच खाण्याचे एकत्र ठिकाण बंद करावे. • सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतूकीकरण करणेत यावे

5.4.5 ) जर एखादा कामगार कोव्हीड सकारात्मक आल्यास त्याला वैद्यकीय रजा देणेत यावी व त्याला कामावर गैरहजर या कारणास्तव कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांस पूर्ण पगारी वेतन देणेत यावे. 5.4.6 ) या आदेशानुसार परवानगी न देणेत आलेल्या सर्व कारखाने आणि उद्योग यांनी त्यांचे कामाकाज सदर आदेशाची मुदत संपेपर्यत तात्काळ बंद करावे. या संदर्भात काही शंका असल्यास उद्योग विभाग यांचेशी संपर्क करावा. अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री.राजेश जोशी प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी औरंगाबाद 942223005502 श्री.दिपक शिवदास उपसंचालक, उद्योग 8308607671

5.5) रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रते : (Roadside Eatable Vendors)• रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना त्याच ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास देवू नयेत – फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी 07.00 वा ते रात्री 08.00 वा. यावेळेत सर्व दिवशी सुरु ठेवाव्यात.• प्रतिक्षाधीन ग्राहकांना काऊंटर पासून दूर अंतरावर सामाजिक अंतर राखून उभे करावे.• सदर आदेशाचा भंग करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यावर साथरोग संपूर्ण संपेपर्यंत व्‍यवसाय बंद ठेवणेची कार्यवाही करावी.• ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यानी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे. त्याची मुदत 15 दिवस असेल. सदर नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.• स्थानिक प्रशासनाने / स्थानिक स्वराज्य संस्थेने सदर विक्रेत्यांवर प्रत्यक्ष किंवा सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवावे. जे विक्रेते आणि ग्राहक सदर कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयक नियमांचे उल्लंघन करतील, ते दंडनीय कारवाईस पात्र राहतील.• जर विक्रते पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन करत असलेची स्थानिक प्रशासनाची खात्री झालेस व सदर विक्रते दंड करुनही नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांचेवर निलंबनाची किंवा साथरोग आटोक्यात येई पर्यंत तात्पुरते किंवा कायम स्वरुपी बंद ठेवणेची कारवाई करणेत यावी. अ.क्र. Covid-19 निरीक्षक01 संबंधित उपविभागीय अधिकारी : SDM02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा03 संबंधित मुख्‍याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती

5.6 ) वृत्तपत्रे / मासिके / नियतकालिके : (Newspapers/ magazines/periodicals) शासनमान्‍य यादीवरील वृत्‍तपत्रे, उपगृह वाहीनीवरुन प्रसारित होणारे चॅनल्‍स अधिस्‍वीकृती धारक (Accreditation) पत्रकार, (साप्‍ताहिक, YouTube चॅनल,Web Portal वगळून)• वृत्तपत्रे / मासिके / नियतकालिके छपाई व वितरण • फक्त घरपोच सेवा सुरु राहिल.• या सेवेशी संबंधीत सर्व कर्मचाऱ्यांचे भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री.मुकुंद चिलवंत जिल्‍हा माहिती अधिकारी, औरंगाबाद 986919313502 श्री. श्‍याम टरके माहिती सहाय्यक जिल्‍हा माहिती कार्यालय औरंगाबाद 9860078988

6) मनोरंजन, करमणूक, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स वगैरे विषयक : (Recreation, Entertainment, shops, malls, shopping centres etc.) सदर आदेशातील मुद्द क्र. 1 बाबत कोणताही पूर्वग्रह न ठेवता असे जाहीर करणेत येते की -• सिनेमा हॉल बंद राहतील. • नाटयगृहे आणि प्रेक्षागृहे बंद राहतील. • मनोरंजन पार्क/ आर्केडस्/ व्हिडीओ गेम्स पार्लर्स बंद राहतील.• वॉटर पार्क बंद राहतील. • क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रीडा संकुले बंद राहतील. • वरील आस्थापनाशी निगडीत व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे भारत सरकारकडील निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास कार्यालये सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.• चित्रपट / मालिका / जाहिराती यांचे चित्रीकरण बंद राहिल.• ज्या दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स मधून अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविल्या जात नाहीत ती बंद राहतील.• सर्व सार्वजनिक ठिकाणे जसे की, बगिचे, खुल्या जागा इ. ठिकाणे बंद राहतील. या व्यतिरिक्त या आदेशाच्या अंमलबजावणी दरम्यान एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाबाबत परवानगी देणे / परवानगी नाकारणे बाबतचे निर्णय स्थानिक प्रशासन घेवू शकेल. अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्रीमती अपर्णा थेटे उपायुक्‍त महानगरपालिका औरंगाबाद 909654999002 श्री. सुखानंद बनसोडे करमणूकर विभाग,जिल्‍हाधिकारी कार्यालय 9552470317

7) धार्मिक / प्रार्थना स्थळे : (Religious Places of Worship)• सर्व धार्मिक / प्रार्थना स्थळे बंद राहतील. • सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारिक आणि धार्मिक सेवा करता येतील. परंतु यावेळी कोणत्याही अभ्यागतांस / भक्तांस प्रवेश असणार नाही. • धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये सेवा देणारे सेवेकरी यांचे भारत सरकारकडील निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास धार्मिक / प्रार्थना स्थळे सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.अ.क्र. Covid-19 निरीक्षक01 संबंधित उपविभागीय अधिकारी02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा03 संबंधित मुख्‍याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती 8) केशकर्तनालय दुकाने/स्पा/ सलून/ ब्युटी पार्लरस : (Barber Shops/Spa/Salon/Beauty Parlors)• सर्व केशकर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस बंद राहतील. • भारत सरकारकडील निकषाप्रमाणे सर्व केशकर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस मधील कामगार वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास सर्व केशकर्तनालये दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल. अ.क्र. Covid-19 निरीक्षक01 संबंधित उपविभागीय अधिकारी02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा03 संबंधित मुख्‍याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती

9) शाळा आणि महाविद्यालये : (Schools and Colleges) • सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. • वरील नियमामधून 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना सूट असेल. परीक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे किंवा 48 तासापर्यत वैध असलेले कोरोनाचे –Ve RTPCR/RAT/TruNAT/CBNAAT Test प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहिल. • महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परीक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणाकडून औरंगाबाद जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी कोणताही त्रास होऊ न देता, स्थानिक आपत्ती प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन परीक्षा घेता येतील.• ज्या विद्यार्थ्यांना ऑफ लाईन परीक्षा द्यावयाची आहे अशा विद्यार्थ्यांसोबत एक व्यक्तीला प्रवास करणेस परवानगी असेल सदर प्रवासावेळी विद्यार्थांने संबंधीत परीक्षेचे प्रवेश पत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.• सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील.• अशा प्रकारच्या आस्थापनेतील सर्व कर्मचारी यांनी भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे जेणेकरुन पुन्हा वेगाने सुरु करण्याबाबत निर्णय घेणे सोईचे होईल.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री. सुरज जैस्‍वाल शिक्षणाधिकारी, (प्रा )जि.प.औरंगाबाद 9226966366०२ श्री.बी.बी.चव्‍हाण शिक्षणाधिकारी,(माध्‍य) जि.प.औरंगाबाद 9423155444

10) धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम : (Religious, Social, Political, Cultural Functions) 10.1) कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना परवानगी असणार नाही. 10.2) ज्या जिल्हयामध्ये निवडणुका प्रस्तावित असतील, त्या ठिकाणी राजकीय सभा / मेळावे घेण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी देणेत येईल.  संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार संबंधित राजकीय मेळावे / सभा यांना बंदिस्त सभागृहासाठी ( Closed Space )50 पेक्षा जास्त नाही किंवा सभागृहाच्या बैठक क्षमतेच्या 50 % चे अधीन राहून आणि खुल्या ठिकाणी ( Open Space) 200 पेक्षा जास्त नाही किंवा खुल्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50 % या पैकी कमी असेल त्या क्षमतेच्या अधिन राहून सर्व कोव्हीड -19 शिष्टाचाराचे पालन करणेच्या अटीवर परवानगी देणेबाबतची कार्यवाही करावी.  संबंधित परवानगी देणेत आलेल्या राजकीय सभा / मेळावे संबंधित क्षेत्राचे त्या त्या स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा नेमलेल्या अधिकारी यांचेमार्फत योग्य नियमांचे पालन केले जात असलेची खात्री केली जाईल.  सदर ठिकाणी कोव्हीड -19 शिष्टाचाराचे उल्लंघन झालेस संबंधित ठिकाणचा जागा मालक हा यासाठी जबाबदार राहिल आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नूसार दंडास पात्र राहील. गंभीर प्रकारचे उल्लंघन झाल्यास सदर ठिकाण हे कोव्हीड -19 साथ संपेपर्यत बंद करण्यात येईल. एखाद्या उमेदवारांच्या दोन पेक्षा जास्त राजकीय सभा आणि मेळाव्यामध्ये सदर बाबींचे उल्लंघन झालेस, पुन्हा सदर उमेदवाराच्या राजकीय सभा / मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही.  कोणत्या प्रकारच्‍या मिरवणुका, कोपरा सभा या ठिकाणी कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल.  वरील सर्व मार्गदर्शक सूचना या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वासाठी समान राहतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत, याविषयी दक्षता घेणे.  मतदानाच्या दिवशी रात्री 08.00 वा. पासून सदर आदेशातील इतर सर्व तरतुदी मतदान झालेल्या क्षेत्रासाठी संपूर्णपणे अंमलात येतील.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री.डॉ.अनंत गव्‍हाणे अपर जिल्‍हाधिकारी जि.का. औरंगाबाद 942020555502 श्री.संतोष कवडे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि. प. औरंगाबाद 9021496627

10.3) लग्नसमारंभाला जास्तीत जास्त 25 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल : (Marriages will be allowed only with maximum of 25 people present) लग्नसमारभांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी सेवा देणाऱ्या सर्व कामगार वर्गाचे लसीकरण करणे बंधनकारक असेल आणि जोपर्यत लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यत वैध – Ve RTPCR/RAT/TruNAT/CBNAAT Test प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहिल. तसेच लग्‍नसमारंभासाठी उपस्थित असणा-या सर्व व्‍यक्‍तींची नावे,पत्‍ता , मोबाईल नंबर संबंधित स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था( मनपा/नपा/ग्रा.प.) यांचेकडे देणे बंधनकारक राहिल. कारण अशा ठिकाणी एखाद्या व्‍यक्‍तीस कोविडचा संसर्ग झाल्‍यास, संबंधित व्‍यक्‍तींची Contact Tracing करणे सोईचे होईल. – Ve RTPCR Test प्रमाणपत्र व लसीकरण केलेले नाही अशा सेवा देणारा व्यक्ती निर्दशर्नास आल्यास त्यास रक्कम रूपये 1000/- दंड आकारला जाईल आणि संबंधित आस्थापना मालकास रक्कम रूपये 10,000/- दंड आकारला जाईल.  लग्नसमारंभ आयोजित केले जात असलेल्या हॉलच्या परिसरामध्ये पुन्हा पुन्हा उल्लघंन झालेस सदर परिसर हा सिल केला जाईल, तसेच सदर ठिकाणी दिलेली परवानगी कोव्हीड -19 साथीची अधिसचूना संपेपर्यत रद्द केली जाईल. धार्मिक स्‍थळाच्‍या आंतमध्‍ये ( Inside Temple ) लग्नसमारंभ आयोजित करणेस वरील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. अ.क्र. Covid-19 निरीक्षक01 संबंधित उपविभागीय अधिकारी02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा03 संबंधित मुख्‍याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती

10.4) अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना परवानगी असेल. सदर अंत्यविधी चे ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण करावे. सदर कर्मचाऱ्यांस वैध – Ve RTPCR / RAT / TruNAT / CBNAAT Test प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. वरील बाबीसाठी समन्‍वय अधिकारी म्‍हणून महानगरपालिकेचे उपायुक्‍त, संबंधित नगरपालिका/नगरपंचायत यांचे मुख्‍याधिकारी व संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ( त्‍यांनी त्‍यांचे स्‍तरावरुन संबंधित ग्रा.पं.च्‍या ग्रामसेवकाची नेमणूक करावी.) समन्‍वय अधिकारी यांनी वरील बाबींसाठी शासनाने निर्गमित केलेल्‍या अटी व शर्तीनुनसार धार्मिक स्‍थळी विवाह संबंधीत कार्यक्रम मर्यादित लोकांचे उपस्थितीत होत आहे किंवा नाही याबाबत तपासून खात्री करावी. अ.क्र. Covid-19 निरीक्षक01 संबंधित उपविभागीय अधिकारी02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा03 संबंधित मुख्‍याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती

11) ऑक्सिजन उत्पादक : (Oxygen Producers)• सर्व औद्योगिक आस्थापनांना ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही. तथापी योग्य कारणास्तव त्यांचे परवाना प्राधिकाऱ्याकडून पूर्व परवानगी घेवून फक्त अत्यावश्यक सेवेशी निगडीत असणाऱ्या सेवांसाठीच वापर करता येईल. • ऑक्सिजनच्‍या वापराबाबत पुढीलप्रमाणे केवळ 3 बाबी अनुज्ञेय आहेत. 1) Pharmaceutical Companies2) Vaccine Production Companies3) Production of Essential Medical Equipment• सर्व ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्याकडे असणारा ऑक्सिजन साठा हा वैद्यकीय व औषधनिर्माणासाठीच राखीव ठेवणेचा आहे. त्यांनी त्यांचे ग्राहकांची नांवे व वापर दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून प्रमाणीत करुन प्रसिध्द करावीत. अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री. श्रीमंत हारकर उपसंचालक, प्रादेशिक पर्यटन औरंगाबाद 758864923002 श्री.हेमंत गांगे सहायक विक्रीकर आयुक्‍त औरंगाबाद 883049227603 श्री विजय जाधव सहायक संचालक पर्यटन संचालनालय एम टी डि सी औरंगाबाद 8999097255

12) ई-कॉमर्स : (E-Commerce)• ई-कॉमर्स सेवेद्वारे फक्त मुद्दा क्र. 2 मध्ये उल्लेख केलेल्या अत्यावश्यक वस्तूंचीच घर पोहोच सेवा सुरु ठेवणेत यावी.• ई-कॉमर्स सेवेद्वारे घर पोहोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. जे कर्मचारी घरपोहोच सेवे व्यतिरीक्त इतर कार्यात सहभागी असतील व त्यांचे घरपोहोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांशी सुसंवाद होत असेल तर त्यावेळी मुद्दा क्र. ५ मधील निर्देशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.• ज्या बिल्डींग मध्ये एका पेक्षा जास्त कुटूंबे रहात असतील अशा बिल्डींग मध्ये घर पोहोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी इमारतीच्‍या आत न जाता गेटजवळूनच वस्तु द्याव्यात अथवा बिल्डींगच्या कर्मचाऱ्यामार्फत सदर वस्तु द्याव्यात. घर पोहोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड-19 निर्देशांचे तंतोतंत पालन करणेचे आहे.• कोविड-19 निदेशांचे काटेकोर पालन न करणाऱ्या आस्थापनांना रु. 1000/- दंड करणेत यावा व पुन्हा अशा चुकांची पुनरावृत्ती झालेचे आढळलेस अशा आस्थापनांचा परवाना कोविड-19 चा प्रादुर्भाव साथ संपुष्टात येईपर्यंत रद्द करणेत यावा. अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री. अनिल थोरात राष्‍टूीय सूचना विज्ञान केंद्र, औरंगाबाद 937036291402 श्री.शरद दिवेकर जिल्‍हा व्‍यवस्‍थापक माहिती तंत्रज्ञान विभाग जि.का.औरंगाबाद 9168511100

13) सहकारी गृह निर्माण संस्था : (Cooperative Housing Societies)• कोणत्याही सहकारी गृह निर्माण संस्थेत एका वेळी पाच कोरोना सकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्ती आढळल्यास सदर सहकारी गृह निर्माण संस्था सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल.• अशा गृह निर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांना प्रवेश बंदी असलेबाबतचा फलक लावणे बंधन कारक असेल.• सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राशी ( Micro Containment Zone ) संबंधित सर्व नियमांचे सोसायटीने काटेकोरपणे पालन करावे. तसेच सोसायटीमध्‍ये येणा-या व जाणा-या सर्व नागरिकांना सोसायटीने प्रतिबंधित करावे. • जर एखाद्या गृह निर्माण संस्थेने उक्त नमूद निर्देशांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस रक्कम रुपये 10000/- दंड करणेत येईल व दुसऱ्या वेळेस त्यापेक्षा जास्त दंड तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळोवेळी ठरविले प्रमाणे आकारणेत येईल. सदर आकारणेत आलेल्या दंडाच्या रक्कमेचा वापर हा सोसायटीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे पालन करणेसाठी नेमणेत आलेल्या कामगारांच्या पगारासाठी करणेत येईल. • सर्व सहकारी गृह निर्माण संस्थानी त्यांच्या संस्थेत वेळोवेळी येणाऱ्या व्यक्तींची ते जोपर्यंत लस घेत नाहीत तोपर्यंत RTPCR/RAT/TRUNAT/CBNAAT चाचणी शासकीय निर्देशानुसार करावी.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री. सुधाकर गायके जिल्‍हा विशेष लेखापरिक्षक वर्ग 1 सहकारी संस्‍था औरंगाबाद 832982464802 श्री. मुकेश बाराहाते उपनिबंधक सहकारी संस्‍था औरंगाबाद 7588154362

१४) बांधकाम विषयक कामे : (Construction Activity)• ज्या बांधकाम क्षेत्रात बांधकामाशी संबंधित कर्मचारी / मजूर यांना त्याच ठिकाणी राहणेची सोय आहे अशा बांधकाम व्यवसायास परवानगी असेल. अशा ठिकाणी साधन सामुग्री वाहतुकी व्यतिरिक्त कामगार व इतर वाहतुकीस परवानगी असणार नाही.• ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असतील त्यानी भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे.• नियमांचे भंग करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांस रक्कम रुपये 10,000/- दंड आकारणेत येईल. तसेच पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लघन झालेस सदर बांधकामाचे ठिकाण हे कोव्हीड -19 संसर्ग कमी होत नाही, तोपर्यत बंद करणेत येईल. • एखादा कामगार हा कोव्हीड -19 विषाणू + Ve आढळून आल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करणेत यावी. त्याला कामावर गैरहजर या कारणास्तव कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांस पूर्ण पगारी वेतन देणेत यावे.• नागरिकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने जी मान्सुनपूर्व बांधकामे करणे अत्यावश्यक आहे अशा मान्सुनपूर्व बांधकामास परवानगी असेल.अ.क्र. Covid-19 निरीक्षक 01 संबंधित उपविभागीय अधिकारी 02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा 03 संबंधित मुख्‍याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत 04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती 05 श्री सुमेध खरवडकर, सहायक संचालक, नगररचना औरंगाबाद 942220907306 श्री जयंत खरवडकर , सहायक संचालक, नगररचना औरंगाबाद 976499965607 श्री. विजय इंगोले, सहायक संचालक, नगररचना औरंगाबाद 9422295365

15) दंडनीय कारवाई : (Penalties)• यापूर्वी इकडील दिनांक 27/03/2021 व 05/04/2021 रोजीच्या आदेशामध्ये नमूद दंड या आदेशास संलग्न असून तो दिनांक 01/05/2021 पर्यत लागू राहिल. • जमा होणाऱ्या दंडाची रक्कम संबंधीत आपत्ती व्यवस्थान प्राधिकारणाकडे देणेत येईल. सदर दंडाच्या रक्कमेचा वापर कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपायोजनासाठी करणेत येईल. • उपरोक्त आदेशाच्या तंतोतंत अंमलबजावणी साठी Covid-19 निरीक्षक/पर्यवेक्षक यांच्या नियुक्ती बाबत श्री.संजीव जाधवर निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद, श्री.नंदकिशोर सारंगधर भोंबे, सहायक आयुक्त म.न.पा औरंगाबाद व श्री.अशोक बनकर, सहायक पोलीस आयुक्त, औरंगाबाद कार्यवाही करतील. सदरचा आदेशांची अंमलबजावणी दिनांक 14 एप्रिल, 2021 चे रात्री 8.00 वाजलेपासून ते दिनांक 01 मे , 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंत लागू राहिल. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.