पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली शहरातील लॉकडाऊनची पाहणी

Image

लातूर, दि.१५/ प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊनची सुरुवात झाली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी (दि.१५) लातूर शहरातील औसा रोड, नंदी स्टॉप भागात फिरून लॉकडाऊनची पाहणी केली.
यावेळी अत्यावश्यक सेवा देणारे औषधी दुकानदार व अन्य सेवा देणाऱ्या व्यवसायिकाशी संवाद साधला.

Image

लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून शासन आणि लातूर मनपास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांची उपस्थिती होती.