भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निलंगा येथे 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून केले अभिवादन

निलंगा ,१४ एप्रिल /प्रतिनिधी 

कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबीर घेऊन रक्तसंकलन करावे असे आवाहन केले होते त्यास प्रतिसाद म्हणून निलंगा शहरातील शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेच्या अनुयायांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते,

Displaying IMG-20210414-WA0087.jpg

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव,नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,पोलीस निरीक्षक अनिल चोरमले,प्रा. सुनील नावाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. गजेंद्र तरंगे व धमानंद काळे यांनी  प्रथम रक्तदान करून शिबिरास सुरुवात केली.यावेळी शितल ढेरे, राधा जगताप, जयश्री सुर्यवंशी, क्रांती सुर्यवंशी, शुभांगी निलंगेकर या महिलांनी रक्तदान केले,या शिबिरास निलंगा शहरातील सर्व सामाजिक तसेच राजकिय बांधवांनी भेट देऊन रक्तदान केले.

Displaying IMG-20210414-WA0086.jpg

यावेळी भालचंद्र ब्लड बँकेचे डॉ. योगेश गवसाने, दिगंबर पवार, संतोष पाटील ,सुनील जहागीरदार,आदींनी काम पाहिले,हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.शेषराव शिंदे,डॉ. प्रल्हाद सोळुंके,डॉ. उद्धव जाधव,रजनीकांत कांबळे, अंकुश ढेरे, जाधव एम एम, उत्तम शेळके, अनिल अग्रवाल,विनोद सोनवणे, परमेश्वर शिंदे, सुबोध गाडीवान, मेघराज जेवळीकर, रामलिंग पटसाळगे,अमोल सोनकांबळे,दाजीबा कांबळे,आदींनी परिश्रम घेतले..