पोलिस कोठडी फोडून चोरट्यांनी ठोकली धूम,लातुरच्या गांधी चौक पोलिस ठाण्यातील भरदुपारची घटना

एकाला उस्मानाबादेतून केली अटक अन्य दोेघे फरार

लातूर, .१४ एप्रिल /प्रतिनिधी

जबरी चोऱ्या व घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या तीन आरोपींनी पोलिस कोठडीच्या खिडकीचे गज वाकवून धूम ठोकल्याची घटना बुधवारी (दि. १४) दुपारी लातूर शहरातील गांधी चौक पोलिस ठाण्यात घडली. भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे पाचावर धारण बसलेल्या पोलिसांनी धावा-धाव करीत एकाच्या उस्मानाबादेतून मुसक्या आवळल्या तर अन्य दोघे अद्यापही फरार आहेत.

Republic Media executive's police custody extended

औसा, भादा, विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांमध्ये आरोपी अमोल उर्फ पप्पू भागवत शिंदे, अजय उर्फ दुडी सुरकास पवार व रामाचारी बस्किटि उर्फ रामन्ना पवार या तिघांविरुध्द चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुरनं. ५६/२०२१ कलम ३७९, ३४ भादंविखाली या आरोपिंना अटक करुन शहरातील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. बुधवारी (दि.१४) दुपारी एक-दीड वाजेच्या सुमारास त्या तिघांनी कोठडीच्या व्हेंटिलेटर खिडकीचे गज वाकवून पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली. त्यामुळे पोलिसांनी गुरनं. २४५/२०२१ कलम २२४ व ३४ भादंविनुसार गुन्हा नोंद दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी विविध पथके नेमून आरोपिंचा शोध सुरू केला. त्यामुळे यातील अजय उर्फ दूडी सुरकाश पवार याला उस्मानाबाद जल्ह्यिातील धानोरी येथून अटक केली, तर अन्य दोघे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले आहेत.