लसीकरण उत्सवात राज्यात लसीचा तुटवडा ,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला भाजपाचा समाचार 

जालना,१३ एप्रिल /प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  हे प्रयत्न करत आहेत असे टोपे म्हणाले. लस मिळत नाही याची खंत वाटते लसीकरण उत्सव साजरा करण्यात येतो,अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाजपाचा समाचार घेतला.  
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा रूग्णालयात तातडीने आवश्यक गरजे नुसार  बेडस् वाढवण्यासाठीचे तसेच ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था उभी करण्याचे अतिशय स्पष्ट आदेश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत या सगळ्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे स्थानिक पातळीवर डाॅक्टर, नर्स ,पॅरामेडीकल स्टाफ ची थेट भरती करण्याचे सगळे  अधिकार देण्यात आले आहेत कुठेही काहीही अडचण नाही  यानंतरही कुठे रूग्णालयाच्या व्यवस्था कोलमडून पडत असतील तर तो तिथल्या स्थानिक पातळीवरील संबंधित अधिकार्यांचा निष्काळजीपणा  असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.  जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ते बोलत होते. 

मॅनेजमेंट मधील फोर एम म्हणजे मनी,मॅन, मटेरियल, मेथड या चारही गोष्टीची काळजी घेण्यात आली आहे सरकारच्या वतीने हे मुद्दे  क्लिअर केलेले आहेत  ज्यात रिसोर्स, फंड पैसा,मणुष्यबळ,मेडिसीन आणि मेथड यात रोजी राज्यात कोणत्याही जिल्हाधिकार्‍यांना कुठेही अडचण नाही यानंतरही जर कुठे काही प्रकार घडत असतील तर तो त्या ठिकाणचा गलथानपणा आहे कोव्हीड विरोधातील संसाधने उभारण्यास कुणाला  कोणताही अडथळा नाही. रेमडिसिव्हिर हे काही अमृत नाही ते घेतले की माणूस मरणार नाही असे काही नाही तो अॅन्टीव्हायरल ड्रग आहे त्याला पर्याय उपलब्ध आहेत आता त्याचे उत्पादन दुप्पट होत  आहे असे टोपे यांनी सांगितले. 

जान है तो जहान है , सर सलामत तो पगडी पचास  आपल जीवन  सुरक्षित पाहिजे ,आपले  आरोग्य चांगले पाहिजे ,परिक्षा आज नाही तर उद्या होतील.  दहावीच्या सगळ्या  विद्यार्थ्यांना तामिळनाडू प्रमाणे  प्रमोट करता येईल आपण या संदर्भात आग्रही  आहोत लहान मुलांना इन्फेक्शन होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे असेही टोपे यांनी सांगितले.  लाॅकडाऊन नक्की लावण्यात येणार आहे त्यासाठी मानसिक तयारी ठेवा मात्र लाॅकडाऊन लावण्यापूर्वी पूरेसा वेळ आणि सुचना निश्चित  दिल्या जातील गोरगरीबांच्या मदतीचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  हे करत आहेत असे टोपे म्हणाले. लस मिळत नाही याची खंत वाटते लसीकरण उत्सव साजरा करण्यात येतो आहे पण त्यासोबत महाराष्ट्रात दररोज सहा लाख लस केन्द्र सरकारच्या वतीने मिळाली पाहिजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केन्द्र सरकारला लस पुरवण्यासाठी त्यांच्या संबंधाचा महाराष्ट्रासाठी वापर करावा असे आपण आवाहन केले असल्याचे टोपे यांनी सांगितले.