सर्व  सोयी सुविधा उपलब्ध असलेले अत्याधुनिक रुग्णवाहिका गरजेचे-आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर

Displaying IMG-20210413-WA0204.jpg
निलंगा येथे चार रुग्णवाहिकेचे लोकार्पण

निलंगा ,१३ एप्रिल /प्रतिनिधी 

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 13 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे डॉ.समिधाताई  अरविंद पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते चार रुग्णवाहिका चे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके , जि.प.सभापती बापूराव राठोड,  नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे ,नगरसेवक डॉ किरण बाहेती, शंकर भुरके ,महादेव फट्टे,चेअरमन दगडू साळुंके सोळुंके उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार गणेश जाधव गट विकास अधिकारी अमोल ताकभाते पालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर पिटी साळुंखे ,डॉक्टर दिनकर पाटील, सिस्टर भाग्यश्री काळे, सिस्टर जगताप यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Displaying IMG-20210413-WA0195.jpg

राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे निलंगा शहरासह संपूर्ण मतदारसंघातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले अत्याधुनिक   रुग्णवाहिका गरजेचे होते. रुग्णांची मागणी लक्षात घेऊन  घेऊन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी  उपजिल्हा रुग्णालय साठी दोन , ग्रामीण रुग्णालय शिरूर अनंतपाळ साठी एक व प्राथमिक आरोग्य केंद्र साकोळ साठी एक अशा चार रुग्ण वाहिका देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसारलातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री निलंगा विधानसभा मतदार संघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून चार रुग्णवाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आले.