पंतप्रधान मोदींनी जेव्हा लॉकडाऊन घोषित केले त्यावेळी त्यांनी कोणच्याही खात्यात पैसे टाकले नव्हते-नवाब मलिक यांचा भाजपाला सवाल

मुंबई ,१२ एप्रिल /प्रतिनिधी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासोबतच अर्थव्यवस्था ठप्प न करता निर्णय घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊनसंदर्भात बोलताना केला आहे. तसेच भाजपचे नेते पॅकेजची मागणी करुन राजकारण करत आहेत ते योग्य नाही. मागील वर्षी पंतप्रधान मोदींनी जेव्हा लॉकडाऊन घोषित केले त्यावेळी त्यांनी कोणालाही विचारात घेतले नव्हते. याशिवाय त्यांनी कोणच्याही खात्यात पैसे टाकले नव्हते. फक्त राजकारणासाठी असे करा किंवा तसे करा? बोलणे योग्य नाही. लोकांचे जीव वाचविण्यासाठी राज्याला जे करावे लागेल ते नक्कीच करण्यात येईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जिल्ह्यातील कामगार, गरिबांना दोन वेळचे जेवण देण्याचे काम तब्बल चार महिने महाराष्ट्राने केले होते. जेव्हा मजूर पुन्हा त्यांच्या राज्यात गेले तेव्हा महाराष्ट्र जिंदाबादचे नारे त्यांनी दिले होते. आज गुजरातमध्ये रुग्णांसाठी रुग्णालयात जागा नाही. महाराष्ट्रात कोविड काळात जे काम झाले ते कोणत्याही राज्यात होत नाही, असा ठाम विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या गुजरात रेमडेसिविर साठा-वितरणावर टीका झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादी नेत्यांनी केलेल्या मदतीकडे बोट दाखवले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रुग्णांना वैयक्तिक मदत न करता जिल्हा प्रशासन व पालिकांच्या यंत्रणांना वितरण केले आहे. पक्ष व्यासपीठांवर मदत दिलेली नाही.उत्तर प्रदेशमध्ये राम भरोसे कारभार सुरु आहे. चाचण्या तर होतच नाहीत. RT-PCR चाचण्या केल्या जात नाही आहेत. ९० टक्के कुठेतरी अँटीजेन टेस्ट करत आहेत.जर त्यांनी व्यवस्थित टेस्टिंग केली, तर परिस्थिती वेगळी होऊ शकते