कोरोनामुक्त 12 व्यक्तींना रुग्णालयातून मिळाली सुट्टी

परभणी जिल्हात एकुण 2483 संशयितांची नोंद

परभणी, दि.8 :- परभणी येथील जिल्हा रुग्णालयातून एकूण 12 कोरोना बाधित रुग्णांना कसलीही कोरोना बाधितपणाची लक्षणे नसल्याने तसेच त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने राज्य स्तरावरील प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधितांना रुग्णालयातून सोमवार दि. 8 जून 2020 रोजी सुट्टी देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये पूर्णा येथील एक मुलगी व दोन मुले आणि पूर्णा ग्रामीण भागातील माटेगाव येथील तीन स्त्रिया व तीन पुरुष यांचा समावेश आहे. तर गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील एक पुरुष व दोन स्त्रियांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात सोमवार दि. 8 जून 2020 रोजी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे 2 हजार 479 व आज रोजी दाखल झालेले 4 असे एकूण 2 हजार 483 संशयित व्यक्तींची नोंद झालेली आहे. असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *