पीडित मुलीचे बनवाट दस्ताऐवज सादर,आरोपीला हर्सुल कारागृहातून अटक

औरंगाबाद ,९ एप्रिल / प्रतिनिधी 

अल्पवयीन मुलीचा विनयभंगा प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक होउनये यासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जामीन अर्जा सोबत पीडित मुलीचे बनवाट दस्ताऐवज सादर केल्या प्रकरणात अजिंठा पोलिसांनी आरोपीला हर्सुल कारागृहातून ताब्यात घेत शुक्रवारी दि.9 पहाटे अटक केली. अंकुश आनंदा जरारे (रा. ता. सिल्लोड) असे  आरोपीचे नाव असून त्याला रविवारपर्यंत दि.11 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी दिले.

प्रकरणात 17 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता आणि आरोपी हे गावात राहतात. आरोपीचे गावात झेरॉक्स् व कटलरीचे दुकान आहे. आरोपी पीडितेला जबरदस्ती प्रेम संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. पीडिता कॉलेला जात येत असताना आरोपी अनेक वेळा तिचा पाठलाग करत होता. यापूर्वी देखील आरोपीने पीडितेला आपण पळून लग्न करु, मी तुला सुखात ठेवीन असे म्हणत, मात्र पीडितेने भितीपोटी  कोणाला काही सांगितले नाही. 1 मे 2020 रोजी पाच वाजेच्या सुमारास पीडिता घरासमोर उभी असतांना आरोपी तेथे आला व त्याने पीडितेला पाहून तु मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे. माझ्या सोबतत प्रेम संबंध ठेवले नाही तर तुझे लग्न होउ देणार नाही असे म्हणाला. त्यावर पीडितेने तु मला आवडत नाही, यानंतर तु माझ्या समोर देखील येवू नकोस नाहीतर मी घरच्यांना सांगेन असे म्हणून पीडिता घरात जात असतांना आरोपीने तिला बळजबरी मिठी मारली. त्यामुळे पीडिता ओरडी, तिचा आवाज ऐकून घरातून तिचे आजी आजोबा बाहेर, त्यावेळी आरोपीन पीडितेला कोणाला काही सांगितले तर जीवंत मारुन टाकेन असे म्हणत तेथून पळ काढला. प्रकरणात अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

खंडपीठात जामीनीसाठी अर्ज

गुन्हा घडल्यापासून आरोपी पसार होता. त्याचा शोध घेवूनही तो सापडला नाही. त्यादरम्याने आरोपीने गुन्ह्यात अटक होउनये यासाठी औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनीसाठी अर्ज सादर केला. अर्जासोबत आरोपीने खंडपीठात पीडितेचे बनावट आधारकार्ड सादर केले. 

आधारकार्ड बनावट असल्याचे आले समोर

पोलिसांनी आरोपी विरोधात  न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान आरोपीने तत्कालीन तपासी अंमलदारांनी आधारकार्डबाबत चौकशी केली असता सादर करण्यात आलेले आधारकार्ड बनावट असल्याचे समारे आले. तसा अहवाल देखील पोलिसांनी न्यायालयात सादर केला. आणि पीडितेचा शाळेतील निर्गम उतारा, इयत्ता 10 वीचे ओळखपत्र देखील न्यायालयासमोर सादर केेले. आरोपी झेरॉक्स ची दुकान चालवत असून पीडितेने यापूर्वी आरोपीला आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी दिले होते. तेंव्हा आरोपीने त्याचा वापर करुन बनावट आधारकार्ड तयार करुन खंडपीठात सादर करुन दिशाभुल केली.

आरोपीला पोलीस कोठडी

आरोपी काही दिवसांपूर्वी न्यायालयात शरण आला असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला हर्सुल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी आरोपीने पीडितेचे बनावट आधारकार्ड कोठे बनवले, आधारकार्ड बनविण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला. आधारकार्ड तयार करण्यास आरोपीला कोणी मदत केली याचा तपास करणे आहे. तसेच आरोपीने खंडपीठात जामीन अर्जा सोबत सादर केलेल्या बनवाट आधारकार्डची प्रत आरोपीकडून जप्त करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.