स्वारातीम विद्यापीठ: शनिवार व रविवारच्या कडक लॉकडाऊनमुळे त्या दिवशीचे पेपर पुढे ढकलले

नांदेड ,९ एप्रिल /प्रतिनिधी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या हिवाळी-२०२० पदव्युत्तर लेखी परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शनिवार व रविवार या दोन दिवशी कडक लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे या दोन दिवशी होणाऱ्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. वसंत भोसले यांनी कळविले आहे.

No photo description available.

बी. होक आर.एम. आणि बी. एस्सी.हॉस्पिटीलिटी स्टडीज या अभ्यासक्रमाची १० एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता १६ एप्रिल रोजी होणार आहे. एम.ए. (द्वितीय वर्ष), एम.एस.डब्ल्यू (द्वितीय वर्ष), एम.कॉम. (सामान्य) द्वितीय वर्ष, एम.कॉम.(बी.आय.) द्वितीय वर्ष, एम.एस्सी.(सी.एम.) आणि बी.एड. या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २३ एप्रिल रोजी होणार आहे. एम.बीए. (द्वितीय वर्ष), आणि एम.पीएड. व बी.जे., या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २८ एप्रिल रोजी होणार आहे. एम.बीए. (द्वितीय वर्ष) या अभ्यासक्रमाची २४ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २९ एप्रिल रोजी होणार आहे. पी.जे.डी-टी.टी.पी., एम.एड. आणि बी.एफ.ए.,या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २२ एप्रिल रोजी होणार आहे. बी.सी.ए., बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स), बी.एस्सी. (सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग), बी.एस्सी. (नेटवर्क टेक्नॉलॉजी), आणि बी-होक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) या अभ्यासक्रमाची १० एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता १५ एप्रिल रोजी होणार आहे. बी.एस्सी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी), बी.एस्सी (बायोइन्फॉर्मेटिक्स), बी.होक-(डब्लूपिटी), बी.होक.(एफपिपीएस), इंजीनियरिंग आणि विधीमधिल एल.एल.बी. (तृतीय वर्ष), बी.एस.एल. (पाचवा) या अभ्यासक्रमाची १० एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता १२ एप्रिल रोजी होणार आहे. बी.एस्सी. (फूड सायन्स), बी.एस्सी. (बायोकेमिस्ट्री), बी.एस्सी.( फूड टेक्नॉलॉजी), बी. फार्म इत्यादी विषयाची १० एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता १९ एप्रिल रोजी होणार आहे. बी.एस्सी. (बायोकेमिस्ट्री), बीएस्सी. (फूड टेक्नॉलॉजी) आणि बी.फार्म या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २० एप्रिल रोजी होणार आहे. एम.एस्सी. (जनरल), एम.एस्सी.(एस.अे.एन.), एम.एस्सी. (एस.इ), एम.सी.ए., बी.ए. (आय.डी) आणि एम.जे., (ओल्ड अँड न्यू) या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २६ एप्रिल रोजी होणार आहे. बी.एड. (व्हीबी) या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता ०४ मे रोजी होणार आहे. एम.एड. (व्हीजे) या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता ३० एप्रिल रोजी होणार आहे. बि.पीएड, या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी ची परीक्षा आता २९ एप्रिल रोजी होणार आहे. बी.लिब. ( ओल्ड & न्यू) आणि एम.लिब. (ओल्ड & न्यू) या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २७ एप्रिल रोजी होणार आहे.

तरी परीक्षेच्या वेळापत्रकातील  तारखा बाबत करण्यात आलेला बदल संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या निर्दशनास आणून द्यावा. आणि त्यानुसार परीक्षा घेण्यात याव्यात असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र संचालक डॉ. वसंत भोसले यांनी केले आहे.