हिंगोली जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, बार, दारु दुकाने पूर्णपणे बंद — जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

हिंगोली दि. 08 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स, बियर व वाईन बार, बियर व वाईन दुकाने (शॉपी) आणि देशी दारु दुकाने दि. 30 एप्रिल, 2021 पर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय , कायदेशीर कारवाई संबंधित अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना प्रवेशास मनाई

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना तसेच जिल्हाधिकारी यांना भेट देण्यासाठी येणाऱ्या अभ्यांगताना दि. 30 एप्रिल, 2021 पर्यंत परवानगीस मनाई केली आहे. नागरिकांच्या कामासाठी ई-मेल पत्ता : [email protected] प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्या कामासाठी ई-मेलचा वापर करावा. तसेच खूप अपवादात्मक परिस्थितीत जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावयाची झाल्यास भेट देणाऱ्या अभ्यांगताकडे 15 दिवस कालावधीतील वैध असलेले आरटीपीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक असलेले प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय , कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.