कॉपीराइट (दुरुस्ती) नियम, 2021 अधिसूचित:नवीन नियम जबाबदारी आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन

नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2021

केंद्र सरकारने  G.S.R. 225(E) दिनांक 30 मार्च 2021 राजपत्र अधिसूचनेद्वारे कॉपीराइट (दुरुस्ती) नियम 2021 अधिसूचित केले आहे. 

The Copyright (Amendment) Rules, 2021

विद्यमान नियम इतर संबंधित कायद्यांच्या बरोबरीने आणण्याच्या उद्देशाने या सुधारणा  केल्या आहेत.  कॉपीराइट कार्यालयात दळणवळणाचे प्राथमिक साधन म्हणून  डिजिटल युगातील तांत्रिक प्रगतीच्या अनुषंगाने  सहज आणि निर्दोष अनुपालन सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे. कॉपीराइट जर्नलच्या प्रकाशनासंदर्भात एक नवीन तरतूद समाविष्ट केली गेली आहे, ज्यायोगे अधिकृत राजपत्रातील प्रकाशनाची आवश्यकता दूर होईल. सदर जर्नल कॉपीराइट कार्यालयाच्या संकेतस्थळावर  उपलब्ध असेल.

उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेला प्रोत्साहित करण्यासाठी रॉयल्टीचे संकलन आणि वितरण करताना रॉयल्टी रकमेची वितरित न केलेली रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक व शोधण्यायोग्य पेमेंट पद्धतींचा वापर करण्यासाठी नवीन तरतुदी आणल्या आहेत. कॉपीराइट सोसायटींच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे, त्याद्वारे कॉपीराइट संस्थांना  प्रत्येक आर्थिक वर्षासाठी वार्षिक पारदर्शकता अहवाल तयार करणे आणि सार्वजनिक करणे आवश्यक आहे.